एक्स्प्लोर

Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील चांदणी चौकातील पूल शनिवार-रविवारच्या मध्यरात्री पाडण्यात येणार, प्रशासनाची तयारी पूर्ण

पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पुल शनिवार आणि रविवारच्या रात्री पाडण्यात येणार आहे. मध्यरात्री दोन वाजता विस्फोट करुन पूल पाडण्यात येणार आहे.

Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता पूल पाडण्याचं काम सुरु करण्यात येणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. रात्री दोन वाजता विस्फोट करुन हा पूल पाडण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. 

मध्यरात्री दोन वाजता ब्लास्ट करण्याच्या कामासाठी चारशे मीटरच्या अंतरामधे फक्त चार व्यक्ती उपस्थित असणार आहेत. यातील तीन व्यक्ती पूल पाडण्याचे काम करणाऱ्या इडिफाई, इंजिनियरिंग  (Edifice engineering) कंपनीचे अधिकारी असतील. तर एक पोलिस अधिकारी असेल.  पूल पाडण्याच्या आधी 200 मीटरच्या अंतरावरील सर्वांना बाजूला हटवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

स्फोट झाल्यावर धूर खाली बसण्यास 15 मिनिटे लागणार आहे.  त्यानंतर स्फोटाच्या ठिकाणी कोणतंही जिवंत स्फोटक राहणार नाही याची पडताळणी केली जाईल. मध्यरात्री अडीच वाजता राडारोडा हटवण्यात सुरुवात करण्यात येईल.  सकाळी आठ वाजेपर्यंत हा राडारोडा हटवण्यात येईल. शहराच्या मध्यभागी हा स्फोट होणार असल्याने राडारोडा लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या राडारोड्याच्या पार्टीकलचा जास्त त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

या मार्गावरची वाहतूक वेगळ्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.  साताऱ्याला जाणाऱ्या नागरिकांनी सिंहगड रोड, कोथरुड, वारजे या मार्गाचा वापर करावा. मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर या कालावधीत वडगावच्या नवले पुलापासून वाहनांना पुणे शहरात प्रवेश करावा लागेल आणि त्या वाहनांना पाषाण किंवा बाणेर मार्गे महामार्गाला जाता येणार आहे. ज्या वाहनांना मुंबईहून सातारला जायचं असेल त्यांना या कालावधीत वाकड- बाणेर मार्गे पुणे शहरात यावं लागेल आणि वडगावचा नवले पुल किंवा कात्रज चौक मार्गे महामार्गाकडे जाता येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
Appi Amchi Collector Marathi Serial : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर;  'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने  एन्ट्री
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर; 'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने एन्ट्री
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
PM Modi In Kolhapur : पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 एप्रिल 2024 एबीपी माझाAmravati : अमरावतीत दुपारनंतर मतदान केंद्रावर तुरळक गर्दी, प्रखर उष्णतेमुळे मतदानाला अल्प प्रतिसादJ P Gavit Loksabha Election : माकप नेते जे.पी. गावितांनी लोकसभा उमेदवारी अर्ज भरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
Appi Amchi Collector Marathi Serial : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर;  'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने  एन्ट्री
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर; 'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने एन्ट्री
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
PM Modi In Kolhapur : पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
Yuvraj Singh Shoaib Akhtar :  भाईचा एक फोन, युवराज सिंह-शोएब अख्तर मध्यरात्री धावत आले; दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
भाईचा एक फोन, युवराज सिंह-शोएब अख्तर मध्यरात्री धावत आले; दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला
Embed widget