एक्स्प्लोर

पुण्यात भाजप नेत्याचा टोकाचा निर्णय, रेल्वाखाली संपवलं आयुष्य 

Pune Crime News :भाजपचे युवा मोर्चाचे (Bharatiya Janata Yuva Morcha ) प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ (Sunil Dhumal)  यांचा मृतदेह हडपसर (Pune, Hadapsar) जवळ रेल्वे पटरीवर दिसला. त्यानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune Crime News : पुण्यातील 35 वर्षीय भाजप नेत्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. भाजपचे युवा मोर्चाचे (Bharatiya Janata Yuva Morcha ) प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ (Sunil Dhumal)  यांचा मृतदेह हडपसर (Pune, Hadapsar) जवळ रेल्वे पटरीवर दिसला. त्यानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, 35 वर्षीय सुनील धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. धुमाळ यांच्या आत्महत्येचं कारण आद्यप समजलं नाही. ज्याठिकाणी मृतदेह मिळाला तिथे कोणतीही सुसाईड नोट अथवा चिट्टी आढळून आलेली नाही. या प्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

रेल्वे पोलीस ( Government Railway Police ) अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, मंगळवारी सकळी आठ वाजण्याच्या सुमारास या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. चौकशीनंतर मृत झालेल्या व्यक्तीचं नाव सुनील धुमाळ असल्यचं समजलं. चालत्या ट्रेनने धडक दिल्याने अनेक गंभीर दुखापत झाली. त्यामुळे हा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीमधून समजतेय. दरम्यान, सुनील धुमाळ यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. याचा पुढील तपास हडपसर पोलीस आणि रेल्वे मार्ग पोलीस करत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, हडपसर येथील साडेसतरानळी येथील रेल्वे रुळावर धुमाळ यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय. ही आत्महत्या आहे की अपघाती मृत्यू हे अद्याप अस्पष्ट असल्याचे लोहमार्ग पोलीसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सागिंतलं.दरम्यान, धुमाळ यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरामधील साडेसतरा नळी परिसरात धुमाळ राहायला होते. 

अपघात की घातपात ?

पुणे जीआरपीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले प्रथमदर्शनी हा अपघात वाटत आहे., कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि प्राथमिक तपासानुसार, सुनील  धुमाळ यांनी सकाळी आपल्या मुलीला दुचाकीवरून शाळेत सोडले. परतत असताना  आपली दुचाकी रेल्वे लाईनवरील एका फाटकाजवळ उभी केली. शेवटचे फोनवर बोलताना आणि रेल्वे लाईनच्या शेजारी चालताना दिसले. त्याच वेळी त्यांना रेल्वेचा धक्का लागला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असेल, असे अधीक्षक दोषी यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget