एक्स्प्लोर
शिवरायांचा इतिहास अमित शाह लिहिणार, विनय सहस्रबुद्धेंची माहिती
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेतून लिहिणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.
![शिवरायांचा इतिहास अमित शाह लिहिणार, विनय सहस्रबुद्धेंची माहिती Bjp President Amit Shah To Write History Of Shivaji Maharaj Latest Update शिवरायांचा इतिहास अमित शाह लिहिणार, विनय सहस्रबुद्धेंची माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/11084121/amit.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेतून लिहिणार आहेत. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून शाह शिवरायांच्या इतिहासाचे अध्ययन करत असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.
अमित शाह यांनी लिहलेल्या आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या 'भारतीय जनता पक्ष राजकारणात कशासाठी?' या पुस्तकाचं प्रकाशन रविवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालं. यावेळी सहस्रबुद्धेंनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सहस्रबुद्धे म्हणाले की, ‘गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरतेची लूट एवढेच चित्र रंगविले जाते. हे चित्र बदलण्यासाठी, आणि महाराजांचा खरा इतिहास गुजराती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शाह पुस्तक लिहिणार आहेत. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी महाराजांच्या इतिहासासंदर्भातील विविध पुस्तकांचा अभ्यासही सुरु केला आहे.’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)