एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रियकरासोबत पळून आलेली तरुणी कुंटणखान्यात, 6 जण अटकेत
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात बिहारमधून प्रियकर आणि त्याच्या मित्रांसह मुंबईत आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला एका टोळीने फूस लावून पुण्यातील बुधवार पेठ येथील कुंटणखान्यामध्ये 30 हजार रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन पीडित तरुणीची सुटका करुन या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा आरोपींना अटक केली आहे.
पीडित 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रियकर नितीशकुमार रामसेवक महापो (18) आणि त्याचा मित्र अंजनीकुमार सहा (18) यांने 25 ऑक्टोबर रोजी बिहारमधून पळवून मुंबईत आणले. मुंबईतून हे तिघेही रोजगाराच्या शोधात गोव्याला जाणार असताना, कुर्ला टर्मिनसमध्ये आरोपी मनसींग चौहान (40) याने या तिघांची ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला.
नितीशकुमार व अंजनीकुमार या दोघांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन दादरला नेले. दोघांना एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी बसवून त्याने त्या हॉटेलमधून पळ काढला. त्यानंतर मनसिंगने पुन्हा पनवेल येथील घर गाठून रात्रीच्या सुमारास पीडित तरुणीवर अत्याचार केला.दोन दिवसांनी पीडित तरुणीला पुण्यातील बहिणीकडे पाठवून तिच्याकडून 30 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपीची बहीण शिल्पाने पीडित तरुणीला पुण्यातील बुधवार पेठ येथील कुंटणखान्यात नेऊन तिला कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेच्या ताब्यात दिले.
तरुणीच्या प्रियकराने पनवेल पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन तरुणीची सुटका केली. या प्रकरणी एकूण 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पीडित तरुणीचा प्रियकर नितीशकुमार व त्याचा मित्र अंजनीकुमार या दोघांविरोधातदेखील अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement