एक्स्प्लोर

Bhigwan Kidnapping Case: पळून गेलेले भिगवणचं जोडपं पोलिस स्टेशनला का गेले? तरूणीने सगळंच सांंगितलं, म्हणाली 'डोळ्यात तिखट, चोरी अन् आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून, दबावावरून...'

Bhigwan Kidnapping Case: माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी प्रियकर आणि त्याच्या भावाने हिसकावून नेली आहे अशी खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे.

भिगवण : आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा थरारक अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला दांडक्याने मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये कोंबून नेले, अशी फिर्याद तरूणीच्या आईने आणि भावाने दिली होती. या प्रकरणी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस (Bhigwan Kidnapping Case) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुलीने मी माझ्या मर्जीने गेली असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे, तर त्याउलट तिच्या नातेवाईकांनी तरूणी स्वतःहून गेली नाही तर तिला पळवून नेलं असल्याचा दावा केला आहे, दरम्यान तरूणीने आपलं एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, तिने पळून गेल्यानंतर पुन्हा बारामती पोलिस स्टेशनला का हजर झाले, नेमकं काय घडलं याबाबतचा संपूर्ण तपशील दिला आहे.

....म्हणून ते पोलिस स्टेशनला हजर झाले

तरूणीने प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, आम्ही नगर दिशेने जाऊन नगरच्या बाहेरील बायपासने पुन्हा पुणे रोडने येऊन हडपसरला पोहोचून हडपसरवरून सासवड मार्गे वाठार, जि. सातारा याठिकाणी बस स्टॉपला थांबलो व दुसऱ्या दिवशी सकाळी दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो असता सोशल मीडियावरून मला कळाले की, माझी आईने प्रियकर व त्याचा भाऊ यांच्याविरोधात मला प्रियकर व त्याच्या भावाने जबरदस्तीने माझ्या आईवर त्याच्या हातातील लाकडी दांडके उगारून प्रियकराच्या भावाने माझी आई व भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पुढ टाकून माझे अपहरण केले आहे, तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी प्रियकर आणि त्याच्या भावाने हिसकावून नेली आहे अशी खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे.

सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून व कोणाच्यातरी दबावावरून खोटी व बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जिने प्रियकराबरोबर १ वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने प्रियकरा सोबत आई व भाऊ यांची नजर चुकवून भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागून निघून गेली होती या पुढील आयुष्य मी त्याच्या सोबतच राहणार आहे. त्याबाबत इतर कोणालाही दोषी ठरविण्यात येवू नये. मी पुर्णपणे सज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.

तरुणीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले?

माझे वडील मयत झाले असून सोबत आई वय वर्षे:- ४०, भाऊ, वय वर्षे:- १८ व भाऊ वय १६ वर्ष असे आम्ही एकत्रित राहत असून आम्ही शेती करून आमच्या कुटुंबाची उपजिवीका भागवतो. मी भिगवण येथे टी.वाय.बी.ए चे शिक्षण घेत असून माझे आमच्या शेजारी राहणारे तरुण याच्याबरोबर मागील १ वर्षापासून प्रेम संबंध होते याची कल्पना माझ्या कुटुंबातील माझी आई व २ भावंडांना होती. मी प्रियकरासोबत लग्न करणार आहे, असे त्यांना वारंवार सांगितलेले होते. परंतु त्यांचा आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता. म्हणून त्यांनी माझे इच्छे विरोधात आमच्या नात्यातील मुलासोबत दि. २२/०२/२०२६ रोजी लग्न करण्याची तारीख व वेळ निश्चित केली होती. या लग्नाला माझा पुर्णपणे विरोध होता मी वारंवार माझी आई व दोन्ही भावंडांना मला तुम्ही ठरविलेल्या मुलासोबत लग्न करणे मान्य नसून मी प्रियकरा सोबतच लग्न करणार आहे त्याचे आणि माझे १ वर्षापासून प्रेम संबंध आहेत तरीही त्यांनी माझे बोलण्याकडे दुर्लक्ष करून माझे इच्छे विरोधात जबरदस्तीने रावणगाव येथील इसमाबरोबर लग्न लावून देण्याचे ठरविले होते. 

हे मला मान्य नसल्याने दि. १७/०२/२०२६ रोजी मी माझा भाऊ याचा मोबाईल नंबर ८XXXXXXXXX या मोबाईल नंबर वरून प्रियकराला फोन करून आज दुपारी मला भिगवण येथील बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी आई आणि भाऊ हे घेऊन जाणार आहेत तरी तू भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागे येवून थांब व मी आई आणि भाऊ यांची नजर चुकवून तुझ्या सोबत निघून येणार आहे. असा फोन प्रियकराला केला होता. आमचे झालेल्या सदर भाषणाप्रमाणे दि. १७/०२/२०२६ रोजी मी माझी आई व भाऊ प्रियकरासोबत फोनवर बोलणे झालेल्या संभाषणाप्रमाणे भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळील आनंद हॉटेलच्या पाठीमागे दि. १७/०२/२०२६ रोजी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी आलो असता त्याठिकाणी अशोक लेलंड या कंपनीचा दोस्त मॉडेल ही टेम्पो गाडी याचा ही गाडी घेऊन प्रियकर थांबलेला होता. त्यावेळेस मी माझी आई व भाऊ यांची नजर चुकवून सदर टेम्पोमध्ये पळत जाऊन बसले व प्रियकराबरोबर नगरच्या दिशेने गेले जात असताना त्वरीत मी माझा भाऊ याचा मोबाईल नं. ८XXXXXXXX या नंबरवर प्रियकराचा मोबाईल नं. ९XXXXXXXX या नंबरवरून दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी मी त्याच्या बरोबर निघून जात आहे माझे त्याच्याबरोबर १ वर्षापासून प्रेम संबंध आहेत याची कल्पना या आगोदर ही मी तुम्हाला दिलेली होती. असे मोबाईल फोनवरून फोन करून सांगितलेले होते.

आम्ही नगर दिशेने जाऊन नगरच्या बाहेरील बायपासने पुन्हा पुणे रोडने येऊन हडपसरला पोहोचून हडपसरवरून सासवड मार्गे वाठार, जि. सातारा याठिकाणी बस स्टॉपला थांबलो व दुसऱ्या दिवशी सकाळी दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो असता सोशल मीडियावरून मला कळाले की, माझी आईने प्रियकर व त्याचा भाऊ यांचेविरोधात मला प्रियकर व त्याच्या भावाने जबरदस्तीने माझ्या आईवर त्याच्या हातातील लाकडी दांडके उगारून प्रियकराच्या भावाने माझी आई व भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पुढ टाकून माझे अपहरण केले आहे तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी प्रियकर आणि त्याच्या भावाने हिसकावून नेली आहे अशी खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे.

सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून व कोणाच्यातरी दबावावरून खोटी व बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जिने प्रियकरा बरोबर १ वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने प्रियकरा सोबत आई व भाऊ यांची नजर चुकवून भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागून निघून गेली होती या पुढील आयुष्य मी त्याच्या सोबतच राहणार आहे. त्याबाबत इतर कोणालाही दोषी ठरविण्यात येवू नये. मी पुर्णपणे सज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Embed widget