एक्स्प्लोर

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, 20 मेर्यंत अर्ज करता येणार

Pune News : पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया 2019 पूर्ण करुन या अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना 'भारतरत्न जे. आर. डी. टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजने'साठी अर्ज करता येणार आहे.

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक विभाग आणि संलग्न मान्यताप्राप्त संशोधन केंद्रात 'पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया 2019' (Ph.D Entrance Exam 2019) पूर्ण करुन या अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना 'भारतरत्न जे. आर. डी. टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजने'साठी अर्ज करता येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना 20 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागून आर्थिक अडचणींचा सामना न करता पीएच. डी. संशोधन करण्याची संधी मिळावी, या हेतूने विद्यापीठात नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना 2018 पासून ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे.

भारतरत्न जे. आर. डी. टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजना, असा करा अर्ज

1. http://unipune.ac.in या वेबसाईट वर क्लिक करा. त्यानंतर BOD Online या पोर्टल ला क्लिक करा.

2. विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या पर्यायांन पैकी PhD/MPhil Tracking हा पर्याय निवडा.

3. तुमचा नोंदणीकृत Username आणि Password टाकून login करा

4. तुमच्या Dashboard मेनू मध्ये तुम्हाला JRD Tata Scholarship Status असं दिसेल, त्या खाली तुम्हाला Do you want to apply for JRD Tata Scholarship? असं विचारेल, Yes हा पर्याय निवडा

5. भारतरत्न जे. आर. डी. टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी खालील माहिती भरणे आवश्यक आहे.

  • a. वैयक्तिक तपशील फोटो आणि सहीच्या स्कॅन कॉपीसह
  • b. शैक्षणिक माहिती कागदपत्रांसह भरावी.
  • c. प्रवेश तपशील (उदा. Provisional Admission Letter / Admission Confirmation Letter/Topic Approval Letter).
  • d. संशोधन मार्गदर्शक तपशील.

6. तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल ती माहिती तपासा आणि Confirm बटणवर क्लिक करा.

7. त्यानंतर तुमचा अर्ज नोंदणीकृत होईल आणि तुम्हाला नोंदणीकृत अर्ज दिसेल

8. नोंदणी केलेल्या अर्जासमोर Print हा पर्याय निवडून तुम्ही भरलेला अर्ज डाऊनलोड करु शकता.

शिष्यवृत्ती योजनेसाठीच्या नियम व अटी

1. सदर योजना विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात पीए.डी. अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पर्व 2019-20 मध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी योजनेस पात्र असणा 100 गुणवंत संशोधक विद्यार्थ्यांना दि. 01/07/2015 पासून अथवा त्यांच्या प्रवेश दिनांकापासून जास्तीत जास्त 2 वर्ष कालावधीसाठी 8000 रुपये प्रतिमहा दराने विहित केलेल्या नियम व अटींच्या पूर्ततेच्या अधिन राहून लागू करण्यात येईल.

2. "भारतरत्न जे आर डी टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजना महाविद्यालयात पीएच.डी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी योजनेस पात्र असणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यास त्याचा प्रवेश झालेल्या दिनांकापासून जास्तीत जास्त 2 वर्षे कालावधीसाठी 6000 रुपये प्रतिमहा दराने विहित केलेल्या नियम व अटींच्या पूर्ततेच्या अधिन राहून लागू करण्यात येईल.

3. किमान 5 वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत असणाऱ्या संलग्नित मान्यताप्राप्त संशोधन केंद्रातील पीएच.डी विद्यार्थ्यांनाच केवळ सदर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करता येतील.

4. सदर शिष्यवृत्ती योजना सुरुवातीस एक वर्ष कालावधीसाठी लागू करुन वर्षअखेर विहित पद्धतीने आढावा घेऊन पुढील एक वर्षासाठी योजनेस मुदतवाढ देण्यात येईल.

5. पीएच.डी. अभ्यासक्रम अपूर्ण ठेवल्यास अथवा अभ्यासक्रम पूर्ण करताना इतरत्र पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ नोकरी केल्यास शिष्यवृत्तीची दिलेली रक्कम विद्यार्थ्यास विद्यापीठाकडे परत जमा करावी लागेल.

6. सदर शिष्यवृत्ती योजना लागू असलेल्या विद्यार्थ्यांना अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

7. विद्यार्थ्याने पीएच.डी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दुसऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला नसावा.

8. प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरी त्यात्या महिन्यात 75 टक्के असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांची हजेरी बायोमॅट्रिक पद्धतीने, मार्गदर्शक व संबंधित विभागप्रमुखांनी प्रमाणित करणे आवश्यक राहिल.

9. सदर योजना लागू असलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी अभ्यासक्रमासाठी लागू असलेले इतर सर्व नियम व अटी बंधनकारक राहतील.

10. सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डीच्या संपूर्ण कालावधीत आपल्या संशोधनाशी निगडीत दोन कार्यशाळेत परिषदेत सहभाग घेऊन शोधनिबंधांचे सादरीकरण करणे आवश्यक असुन तसे प्रमाणपत्र सादग करणे व Refereed Journals मध्ये किमान एक संशोधन लेख (Research Paper) प्रसिद्ध करणे बंधनकारक राहिलं.

11. सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर सहा महिन्याने प्रगती अहवाल (Progress Report) विहित केलेल्या Research Advisory Committee मार्फत सादर करणे बंधनकारक राहिल.

12. फिल्ड वर्कमध्ये केलेले कामकाज मार्गदर्शकाने तपासणे आवश्यक आहे. फिल्डवर्कसाठीच्या रजेचा कालावधी प्रथम मार्गदर्शक व विभागप्रमुख यांच्याकडून मान्य करुन घेणे आवश्यक राहिल. त्यानंतर सजक कालावधी शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरण्यात येईल. अभ्यासक्रमास नोंदणी मान्यतेचे पत्र शिष्यवृत्तीसाठी सादर करणे आश्यक राहिल.

13. सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ते नोकरी करत नसल्याबाबतचे हमीपत्र संशोधक, मार्गदर्शक व संबंधित विभागप्रमुख मा. प्राचार्य संबंधित संशोधन केंद्र यांच्या स्वाक्षरीसह देणे बंधनकारक राहिल.

अशी असेल निवड प्रक्रिया

विहित नमुन्यातील ऑनलाईल अर्ज व संशोधन करत असलेल्या विषयावरील संक्षिप्त प्रस्ताव मागवून मा. कुलगुरु यांनी गठित केलेल्या निवड समितीद्वारे विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करुन मुलाखत घेतल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. चार विद्याशाखांमधअये सदर १०० शिष्यवृत्तींची विभागणी प्राप्त झालेल्या एकूण पत्र अर्जांपैकी त्या त्या विद्याशाखेच्य अर्जांच्या प्रमाणात करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे 

पदवी पदव्युत्तर प्रमाणपत्राची साक्षंकित प्रत (Marks Statement of Master Degree)
पीएचडी प्रवेशपत्र (Provision/Confirmation Admission Paper)
हमीपत्र (Undertaking of Plain Paper)
संशोधनाबाबतचा संक्षिप गोषवारा (Brief Proposal Topic Research)

शिष्यवृत्ती योजनेसाठी महत्त्वाच्या तारखा

- ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 20 मे
- अर्जाची प्रत शैक्षणिक प्रवेश विभागात हस्तपोच करणे : 30 मे पर्यंत

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Embed widget