(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Best Aamaras Thali In Pune : घरच्यासारखा आमरस खायचाय? 'या' आहेत पुण्यातील प्रसिद्ध आमरस थाळी...
पुण्यात अनेक ठिकाणी अनेक आांब्याचे पदार्थ प्रसिद्ध आहे. मॅंग्नो मस्तानी, शेक आणि बरंच काही मात्र घरच्या सारखं साग्रसंगीत जेवण आणि त्यात आमरस अशी भरपेठ थाळीवर ताव मारण्याची अनेकांनी इच्छा असते.
Best Amras Thali In Pune : उन्हाळा आणि आमरस याचं समीकरणच वेगळं आहे. वर्षभर अनेक लोक उन्हाळ्याची वाट खास आमरसाचा आस्वाद घेण्यासाठी बघत असतात. त्यात पुणे म्हंटलं की खवय्येगीरी आलीच. पुण्यात अनेक ठिकाणी अनेक आांब्याचे पदार्थ प्रसिद्ध आहे. मॅंग्नो मस्तानी, शेक आणि बरंच काही मात्र घरच्या सारखं साग्रसंगीत जेवण आणि त्यात आमरस अशी भरपेठ थाळीवर ताव मारण्याची अनेकांनी इच्छा असते. याच आमरसाचा आस्वाद साग्रसंगीत जेवणासोबत घेण्यासाठी पुण्यातील अनेक हॉटेल्समध्ये उन्हाळ्या निमित्त खास आमरस थाळी मिळते आहे. याच हॉटेल्समध्ये आता पुणेकर गर्दी करताना दिसत आहे आणि आमरस थाळीवर ताव मारताना दिसत आहे.
पुण्यातील दर्जेदार आमरस थाळी कुठं मिळतात?
सुकांता थाळी
सुकांता हे सर्व शाकाहारी रेस्टॉरंट आहे. थाळीसाठी पुणेकर सर्वात पहिले सुकांता थाळीचंच नाव घेत असतात. गुजराती आणि महाराष्ट्रीयन थाळी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात त्यांच्याकडे चविष्ठ अशी खास आमरस थाळीदेखील उपलब्ध आहे.
पत्ता: सुकांता, 636 , पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना, पुणे
वेळा: दुपारी 12:00 ते 3:30, संध्याकाळी 7:00 ते 11:00
दुर्वांकुर
पुण्यातील टिळक रोडवर हे दुर्वांकुर हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये अनेक प्रकारच्या थाळ्या आणि चविष्ट जेवण मिळतं. अनेक पुणेकरांच्या आवडीचं हे हॉटेल आहे.
पत्ता: दुर्वांकुर, 1166, न्यू सदाशिव पेठ, सदाशिव पेठ, पुणे
वेळा: दुपारी 12:00 ते 3:30, संध्याकाळी 7:00 ते 11:00
राजधानी थाळी
राजधानी थाळी हे सर्व पुणेकर रहिवाशांसाठी उत्तम शाकाहारी जेवणासाठी जाणाऱ्या रेस्टॉरंटपैकी एक आहे. या ठिकाणी आमरसच नाही तर आंब्यापासून तयार केलेले पदार्थदेखील चविष्ठ असतात.
पत्ता: राजधानी थाली, लेव्हल 2, ईस्ट ब्लॉक, अमनोरा टाउन सेंटर, हडपसर खराडी बायपास, हडपसर, पुणे
वेळा दुपारी 12:00 ते 3:30, संध्याकाळी 7:00 ते 11:00
पंचवटी गौरव
आमच्या यादीतील अंतिम नाव पंचवटी गौरव असेल. गुजराती आणि राजस्थानी थाळीसाठी पंचवटी गौरव फेमस आहे. या ठिकाणी आमरस थाळी बरोबरच आमरस पुरीदेखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे जर पुणेकरांना आमसरावर ताव मारायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
पत्ता: पंचवटी गौरव, कोतवाल कॉम्प्लेक्स, पीवायसी हिंदू जिमखान्याजवळ, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
वेळः सकाळी 11 ते दुपारी 3:30, संध्याकाळी 7 ते रात्री 10:30