एक्स्प्लोर

Baramati News : बारामतीत कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दोघे जखमी, गाड्यांचं नुकसान

बारामती तालुक्यात कारवाई करण्यासाठी (Baramati News) गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी 6 जणांच्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला.

बारामती, पुणे : बारामती तालुक्यात कारवाई करण्यासाठी (Baramati News) गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी 6 जणांच्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला. संदर्भात बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क यांचे पथक बारामती तालुक्यातील माळेगाव गावचे हद्दीत विक्रमनगर येथे कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर जमावाने पथकाला हातातील काठीने व दगडाने मारहान करुन शिवीगाळी केली. तसेच शासकीय व खाजगी वाहनांना दगड मारुन काचाफोडून नुकसान केले यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी किशोर जनार्धन धनगर पिंटु गव्हाणे यांसह अनोळखी 8 ते 10 इसमावर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी विजय वसंतराव रोकडे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक दौंड यांनी फिर्याद दिली होती. झालेल्या हल्ल्यामध्ये पथकातील सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात  भा.द. वि कलम 353, 333, 332, 324, 504, 506, 143, 147, 148, 149,427 सह सार्वजनीक संपत्तीस हानी प्रतिबंध अधि 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. कारवाई करायला गेले असता या पथकावर हल्ला करण्यात आला. यात एका पोलिसाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून चार ते पाच टाके पडले आहेत तर एका पोलिसाच्या तोंडाला जखम झाली आहे, असं फिर्यादी यांनी सांगितलं आहे. हल्ला करण्यासाठी आरोपींनी हत्यारं, लाकडी काठी आणि दगडांचा वापर केला आहे. आरोपींनी केलेला हल्ल्यात दोन गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारी वाहन क्र MH-12 TK-9692, व खाजगी वाहन क्र MH-14-KF-8080 या दोन्ही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सहा जणांचं पथक कारवाई करण्यासाठी गेलं असता हा हल्ला करण्यात आला आहे. 

वर्दीची भीती नाही...

मागील काही दिवसांपासून बारामती शहरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. रोज नवनवे गुन्हे समोर येत आहे. त्यात हल्ले, हत्या आणि मारहणीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र तरीही गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही. त्यातच आता राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला केल्याने वर्दीची भीती उरली नसल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. 

इतर महत्वाची माहिती

Dhirendra Shatri : धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अंनिस आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget