एक्स्प्लोर

Baramati Namo Rojgar Melava : शरद पवारांनी वेळ राखून ठेवला अन् सुप्रिया सुळेंना आमंत्रणच नाही; दोघेही नमो रोजगार मेळाव्याला जाणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 2 तारखेला अजित पवारांचा मतदारसंघ बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्यासाठी राज्यातील महत्वाचे तीन नेते बारामतीमध्ये येणार आहेत

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे येत्या 2 तारखेला अजित पवारांचा मतदारसंघ बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्यासाठी राज्यातील महत्वाचे तीन नेते बारामतीमध्ये येणार आहेत. रोजगार मेळाव्यासोबतच पोलीस उपमुख्यालय, बस स्थानक, पोलीस वसाहतिचे उद्घाटन होणार आहे. पण या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार शरद पवार आणि स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे  (Supriya Sule)  या कार्यक्रमाला जाणार का? हा प्रश्न आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे सुळे यांनी म्हटलं आहे. पण शरद पवारांनी या कार्यक्रमासाठी वेळ राखून ठेवला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा बारामती आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. पण या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थिती लावणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुळे यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे सांगितले आहे. पण खासदार सुप्रिया सुळे यांना याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी संदिग्ध उत्तर दिलं आहे. येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर आहेत..निमित्त आहे पुणे विभागाच्या नमो रोजगार मेळाव्याचे. हा रोजगार मेळावा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. 

या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचं पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमावरून शरद पवार गटाने टीका केली आहे

बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय. हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानात पार पाडतो आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम पार पाडतो आहे ही संस्था 50 वर्षपूर्वी शरद पवारांनी बांधली आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे पण या शासकीय कार्यक्रमाचे आमंत्रण अद्यापही बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आलं नाही.. पण या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी वेळ राखुन ठेवला असल्याची प्राथमिक माहिती आहे. 
 
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत तसेच पाच जिल्ह्यातील युवक युवती रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीत येणारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रोजगार मेळावा शासनाचा असला तरी या कार्यक्रमात राजकिय भाषणं होणार आणि यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकले जाणार का हे पाहणं महत्वाचे आहे. तसेच जर शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर या कार्यक्रमाचे स्वरूपच बदलून जाईल.

इतर महत्वाची बातमी-

Baramati Supriya Sule : नमो रोजगार मेळाव्याचं आमंत्रण आलंच नाही; आलं तर नक्की जाईन: सुप्रिया सुळे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget