एक्स्प्लोर

Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता

संपूर्ण राज्याचं लक्ष असणाऱ्या बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे  एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बारामती, पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष असणाऱ्या बारामती लोकसभेच्या (Baramati Loksabha Constituency) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar )आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नणंद - भावजय विरुद्ध जरी ही लढाई असली तरीही पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असणार आहे. 

सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याचीदेखील माहिती आहे 

दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचादेखील 18 एप्रिललाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार  नामनिर्देश पत्र विकत घेतलं  आहे.18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.  यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारदेखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.

अजित पवार डमी उमेदवार?

बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या नावे पुणे जिल्हाधिकाऱी कार्यालयातून अर्ज खरेदी करण्यात आलाय.  त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे  देखील अर्ज खरेदी करण्यात आलाय.   त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 12  मार्चपासून सुरूवात झाली. अर्ज भरण्याची मुदत 19  एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.

बारामती कोणाची होणार?

राज्याच्या प्रमुख नेत्यांचं लक्ष बारामती काबीज कऱण्यासाठी लागलं आहे. नणंद भावजय जरी उमेदवारी घेऊन निवणडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्या तरीही खरी लढाई ही काका- पुतण्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारामती नेमकी कोणत्या पवारांची होणार?, हे पाहणं महत्वाचं ठरलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Weather Update : पुणेकरांनो उन्हापासून काळजी घ्या;  दोन दिवसात उन्हाचे चटके अधिक तीव्रपणे जाणवणार

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget