वाह क्या बात है! बारामतीत पालखी मार्गात येणारी इमारत न पाडता उचलून मागे सरकवली
Baramati : पालखी मार्गात येणारी दुमजली इमारत उध्द्वस्त करायला मुलाणी कुटुंबाचे धाडस झाले नाही.
Baramati Latest Marathi News Update : रस्त्याचे भूसंपादन करताना अथवा एखाद्या ठिकाणाचे अतिक्रमण हटवताना अनेकदा घरे पाडली जातात. यामुळे नागरिकांचे मोठं नुकसान होते. पण बारामतीमध्ये भूसंपादनावेळी रस्ता रुंदीकरणात आडवं येणारं दोन मजली घर न पाडता चक्क उचलून मागे सरकवण्याचे काम सुरु आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे हा प्रयोग करण्यात येत आहे. पालखी मार्गात येणारे मुलाणी कुटुंबियांचे घर जशाच्या तसे उचलून सरकवण्यात येत आहे. बारामती आणि परिसरात या प्रयोगाची चर्चा सुरु आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. या पालखी महामार्गात काटेवाडीतील मुलाणी कुटुंबियांचे दुमजली घर येत होते. कुटुंबियांना ही इमारात पाडण्याचे धाडस झाले नाही. त्यांनी ही दोन मजली इमारत उचलून जशीच्या तशी नऊ फूट मागे सरकावली जात आहे.
पालखी मार्गात येणारी दुमजली इमारत उध्द्वस्त करायला मुलाणी कुटुंबाचे धाडस झाले नाही. त्यामुळे पालखी महामार्गाला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उभी इमारत आहे तशी पाठीमागे घेता येते, हे सोशल मिडीयावर त्यांना समजले. त्यांनतर त्याच पध्दतीने इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला. काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलानी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क 9 फूट मागे सरकविण्याचे काम सुरु केले. त्यांचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाणा येथील मोहन लाल हाऊसिग लिप्टींग स्पिंटीग कन्ट्रक्शन कंपनी नूरबाला, पानिपत प्रशिक्षित ठेकेदार काम करीत आहेत. नव्याने इमारत उभी करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार होता. सोशल मिडीयावर हरियाणातील या पध्दतीचे काम करणाऱ्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी या सर्व इमारतीचा मागे घेण्याचा दहा लाख रुपयाहून जास्त खर्च सांगितला होता. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊनच त्याचा पुनर्वापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी हा पर्याय निवडला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सध्या इमारत मागे सरकवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण होईल. या प्रयोगाची बारामतीमध्ये चर्चा सुरु आहे. इमारत मागे घेण्याचे काम सुरु असताना ते पाहण्यासाठी गर्दी जमली होती.