एक्स्प्लोर

बँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रवींद्र मराठेंना अखेर जामीन मंजूर

बँक ऑफ महाराष्ट्रचे रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मराठेंना हा जामीन मंजूर करण्यात आला.

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मराठेंना हा जामीन मंजूर करण्यात आला. डीएसके प्रकरणात रवींद्र मराठेंसह काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे मराठे यांना जामीन देण्यात यावा, असं सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सोमवारी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर काल मंगळवारी सकाळी 11 वाजता सुनावणी होणं अपेक्षित होतं. मराठे यांना जामीन देण्यास आमची काहीही हरकत नसल्याचं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं. मात्र रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झालीच नाही. ज्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर समोर सुनावणी सुरु होती ते न्यायाधीश न आल्यामुळे काल मराठेंच्या जामीन अर्जावर कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. दरम्यान सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी तपास अधिकारी पुन्हा पुढील दहा दिवसात पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. शिवाय हे न्यायालयाने लेखी द्यायला सांगितलं. आहे. त्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी न्यायालयाला रविंद्र मराठे यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचं लेखी दिलं होतं. काय आहे प्रकरण? बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या प्रकरणात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली. अधिकाराचा गैरवापर करत नियम डावलून डीएसकेंच्या नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका या बँक अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांचाही समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र बँकेचे तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन एस देशपांडे, बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, बँकेचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता, डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यांचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर, डी एस कुलकर्णी यांचे सीए सुनील घाटपांडे यांना आज अटक झाली. अधिकाऱ्यांवरील कारवाई पोलिसांच्या अंगलट येणार? रवींद्र मराठे यांच्या अटकेप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत स्वतंत्र चौकशीचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री अतिरिक्त पोलिस महासंचालकांची नियुक्ती करणार आहेत. डीएसके प्रकरणात रवींद्र मराठेंना अटक झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी असोसिएशन आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तसंच या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात ‘MPID’ कलमाखाली कारवाई केली. मात्र एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक होते. पण पोलिसांनी तसं काही केलं नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या समस्या वाढू शकतात. याशिवाय पुणे पोलिसांनी ही कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी महासंचालक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनाही अंधारात ठेवल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात डीएसके यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून, बँकेचा त्याच्याशी संबंध नाही. तसेच कर्जाची वसुली प्रक्रियाही सुरू होती. राज्यस्तरीय बँक समितीचे समन्वयक म्हणून रवींद्र मराठे यांनी सतत सकारात्मक भूमिका घेतली असताना थेट या बँकेवरच कारवाई करताना त्याचे बँकिंग व्यवसायावर काय परिणाम होतील, तसेच बँकेच्या पदाधिकाऱ्याचा या घोटाळ्याशी थेट संबंध आहे का याची खातरजमा पोलिसांनी न केल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित बातम्या : बँक ऑफ महाराष्ट्र सीईओ अटकेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार डीएसके प्रकरण : बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई पोलिसांच्या 'अंगलट'? डीएसके प्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या ४ अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget