एक्स्प्लोर

Anjali Damania : मी सिद्धांतावर जगते, माझ्यावर थर्ड ग्रेड स्टेटमेंट करणाऱ्या चव्हाणला समज द्या; अंजली दमानिया अजितदादांवर भडकल्या

Anjali Damania On Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांचा पोलिसांवर दबाव असून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती.

पुणे : मी कोण आहे आणि किती सिद्धांतावर जगते हे अजित पवारांपेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल, त्यामुळे माझ्यावर थर्ड ग्रेड स्टेटमेंट करणाऱ्या सूरज चव्हाणला त्यांनी समज द्यावी असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी दिला. अंजली दमानिया म्हणजे रीचार्जवर काम करणारी बाई अशी टीका अजित पवारांच्या युवक राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांची केली होती. त्यानंतर अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. 

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उपमुख्यंमत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. अजितदादांना बोलायला 4 दिवस का लागले असा सवालही त्यांनी केला होता. त्यांतर सूरज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली होती. 

काय म्हणाले होते सूरज चव्हाण? 

सूरज चव्हाण हे अंजली दमानिया यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, अंजली दमानिया यांच्यावर मी टीका केली होती. कारण सातत्यानं अजित पवार यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली होती. आमच्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीची नार्को टेस्ट व्हायला हवी. मागील एक महिन्याचे त्यांचे कॉल डिटेल्स चेक करायला हवं कारण त्या राजकीय पक्षाचा सुपाऱ्या घेउन बदनाम करत आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया? 

अजित पवार, आज प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात ? आज मला त्या सूरज चव्हाणने  “रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले? मला? मी काय आहे, आणि किती सिधांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का? त्यांना राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता? 

मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांचाकडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे. असले थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स आणि त्यांची मेंटालिटी त्यांनी त्यांच्या खिश्यात ठेवावी. मला इतर महिला राजकारण्यांची प्रतिक्रिया पण हवी आहे. कारण असली थर्ड ग्रेड भाषा राजकारणात पूर्ण पणे थांबलीच पाहिजे. 

 

पोलिसांवर अजित पवारांचा दबाब, दमानिया यांचा आरोप

पुण्यामधील भीषण अपघाताप्रकरणी चार दिवस उलटूनही पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी चुप्पी साधली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित करत अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात ससून रूग्णालय, डॅाक्टर , पोलीस यंत्रणा यांच्यावर अजित पवार यांचा दबाव आहे. त्यांच्या फोनमुळेच सर्व यंत्रणा हतबल झाली असल्याने त्यांच्या फोनची सुद्धा तांत्रीक तपासणी करावी अशी मागणी केली आहे. पुण्यामध्ये अग्रवाल यांचे असलेले व्यावसाय आणि त्याबाबत अजित पवार यांचे काय संबंध आहेत याची माहिती घेत असून पुढील दोन तीन दिवसात आपण ते समोर आणू असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
धक्कादायक! लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन पिंपरीत पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
धक्कादायक! लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन पिंपरीत पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
El Nino Update : पुणे वेधशाळेचा मोठा इशारा! 'एल निनो'मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, पूर्वमोसमी...
पुणे वेधशाळेचा मोठा इशारा! 'एल निनो'मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, पूर्वमोसमी...
Pune Crime News: 'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी क्रिकेटरला पोलिसांनी रस्त्यावर चोपलं, मानेला हात घालत गाडीत कोंबला; विमानतळावरून घरी येताना हायहोल्टेज ड्रामा
बांगलादेशी क्रिकेटरला पोलिसांनी रस्त्यावर चोपलं, मानेला हात घालत गाडीत कोंबला; विमानतळावरून घरी येताना हायहोल्टेज ड्रामा
पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
Air Force Plane Crash : भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु
भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु
Jamun: जांभूळ पिकल्या झाडाखाली... गावागावात जांभळाची गोडी, यंदा फळ जास्ती का आलं? तज्ज्ञांनी कारण सांगितलं
Jamun: जांभूळ पिकल्या झाडाखाली... गावागावात जांभळाची गोडी, यंदा फळ जास्ती का आलं? तज्ज्ञांनी कारण सांगितलं
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
Abhishek Banerjee: अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
Embed widget