एक्स्प्लोर

बहिणींनीच वनराज आंदेकरांची सुपारी दिली, चौकात टोळक्याने कोयत्याने वार करुन गेम केला!

Vanraj Andekar Murder: दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती.  त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पुणे : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder)  यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची (Pune Crime News)  धक्कादायक माहिती बंडू आंदेकरांनी पोलिस स्थानकात दिली.  कौटुंबिक वादातून हा खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वर्चस्वाच्या वादातून जावयानेच या खूनाचा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल नाना पेठ परिसरात गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला. आत्तापर्यंत या प्रकरणी  दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सध्या सुरू आहे.  वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांच्याच दोन मुलींनी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे.  आत्तापर्यंत 10  आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच आत्तापर्यंत 10  आरोपी निष्पन्न झाले असून चार  जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

'तुला पोरं बोलवून ठोकतेच', बहिणीने दिली होती धमकी 

गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे.  त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले. त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आशिर्वादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करीत होता. गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती.  त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या

गणेश कोमकर याने या अगोदर शिवसेना शहर प्रमुच रामभाऊ पारेख यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला होता. वनराज आंदेकर याला आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यात वावरत असे. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर  मुले नव्हती. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याच्याबरोबर एक नातेवाईकही होता. त्याचवेळी 5 ते 6 दुचाकीवरुन 10 ते  12 हल्लेखोर आले.  त्यांच्यापैकी एकाने आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही जणांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यात आंदेकर जागेवरच कोसळला. एका मिनिटात झालेल्या या घटनेनंतर दुचाकीवरुन आलेले सर्व हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर लोकांनी वनराज आंदेकर याला जखमी अवस्थेत के ई एम रुग्णालयात नेले. तेथे त्याचा तपासणीपूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

हे ही वाचा :

पुण्यात गुन्हेगारांना मोकाट रान; नाना पेठेनंतर हडपसरमध्ये कोयत्याचे वार करुन फायनान्स मॅनेजरला संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget