एक्स्प्लोर

Keshav Shankha Pathak : अयोध्येत रामल्लासाठी होणार पुण्यातील पथकाचा शंखनाद; केशव शंखनाद पथकाला खास आमंत्रण

Keshav Shankha Pathak : पुण्यातील एकमेव शंख पथक असलेल्या पथकाला अयोध्येत आमंत्रण देण्यात आलं आहे. पुण्यातील हे केशव शंखनाद पथक अयोध्येत शंखनाद करणार आहे. 

Keshav Shankha Pathak :  देशातील प्रत्येक महत्वाच्या मोहिमेत पुणेकरांचा मोठा सहभाग असतो. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत (Ram temple) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरात मोठी तयारी सुरु आहे. तशीच तयारी पुण्यातदेखील सुरु आहे. पुण्यातील एकमेव शंख पथकाला अयोध्येत खास आमंत्रण देण्यात आलं आहे. पुण्यातील  केशव शंखनाद पथक अयोध्येत शंखनाद करणार आहे. 

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात केशव पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना पत्र पाठवले आहे. हे आमंत्रण पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. सगळेच महत्वाच्या सोहळ्यासाठी शंखनाद करण्यासाठी उत्सुक आहे, असं अध्यक्ष नितीन महाजन यांनी सांगितलं आहे. 

शंखनाद पथकाचं 'केशव'च नाव का?

आपली धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, वाद्यं का आणि कशासाठी वाजवली जात होती आणि त्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात. यासाठी पथकाच्या माध्यमातून शंखाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने केशव शंखनाद पथक तयार करण्यात आलं आहे. ज्यांनी जगाला गीतेच्या उपदेश देवून समाज घडविण्यासाठी प्रेरणा दिली, त्या भगवान श्रीकृष्णचे नावही केशव आहे. अखंड हिंदुस्तानातील हिंदूसमाजाला संघटित करून देव देश धर्मासाठी काम करण्याची शिकवण देवून परम पवित्र भगवा ध्वज आपले गुरू स्थानी ठेवून एकत्रित केलं असे संघ संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ केशव हेडगेवार यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे नावाने संपूर्ण जगात शंख ध्वनीने परिवर्तन व्हावे, असं आम्हाला वाटतं, असं पथकाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे.

2017 पासून शंखनाद पथकाची सुरुवात

2017 मध्ये गणेशोत्सवात शंखनाद करायचा या उद्देशाने शंखनाद पथकाचा सराव पुण्यातील प्रसिद्ध ओमकारेश्वर मंदिरात एक महिना सराव सुरू केला त्यात महिला आणि पुरुषसंख्या फक्त पाच ते सात होती नंतर ती वाढतच गेली. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाच्या आरतीला उपस्थित राहून शंखनाद करत होतो. त्यानंतर गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत मानाचे गणपतीत  स्थिर वादन करू लागलो. 

शंखनादासोबतच पारंपारिक दुर्मिळ वाद्यांचंदेखील वादन

हे पथक पुण्यातील एकमेव शंखनाद पथक आहे. या पथकात  पाचशेहून अधिक वादक आणि संगितकार आहेत. त्यापैकी 90 टक्के महिला आहेत. विशेष म्हणजे यात 5 ते 85 वयोगटातील संगीतकारांचा आणि वादकांचा  समावेश आहे. आता हेच सगळे अयोध्येत वादन करण्यासाठी तयारीला लागले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळा, महाराष्ट्रात आतापर्यंत कोणाला मिळालं आमंत्रण?

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण
Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
ABP Southern Rising Summit 2025: ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
Embed widget