उद्धव ठाकरेंकडून अजितदादांना धक्क्यावर धक्के सुरुच; मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा गळाला!
शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. समर्थांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha) मोठा मोहरा गळाला लागला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. समर्थांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड, राजगुरूनगरमध्ये त्यांनी धक्का दिलाय. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहितेंना ठाकरेंनी शिवबंधनात बांधून घेतलं आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंना ही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिलेत.
डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील कोण आहेत?
- आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे
- माजी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- माजी राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- निरीक्षक- उत्तराखंड, झारखंड, छ्तीसगड, लक्षद्वीप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
