एक्स्प्लोर

Pune Rain: पुण्यात आर्मी... पावसाचा हाहाकार, पूर पीडितांच्या मदतीसाठी 85 जणांची टीम तैनात

Pune Weather Update: लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे.

पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस (Pune Weather Update)   सुरु आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाकडून कशाप्रकारे बचावकार्य सुरु आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच आता   नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain)अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे.  पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी टीम सज्ज करण्यात आली आहे.

लष्कराची 85 जणांची टीम तैनात

तसेच लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले. एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत.

भारतीय सशस्त्र दले  तयारीत 

लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले तयारीत आणि सुसज्ज आहेत.

Pune Rain Video : 32 वर्षांत पहिल्यांदा पुण्यात असा पाऊस बरसला; हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपींची प्रतिक्रिया 

हे ही वाचा :

पुण्यात पावसाचे चार बळी; अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तिघांना शॉक, तर भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

                                 

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget