Pune Crime News : मोबाईल चोरल्याच्या संशय; तरुणांनी थेट महिलेवर गोळ्या झाडल्या; पुण्यात नेमकं चाललंय काय?
पुण्यात सलग चौथ्या दिवशी खुनाचे सत्र सुरूच आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी महिलेचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.
पुणे : पुण्यात सलग चौथ्या दिवशी खुनाचे सत्र सुरूच आहे. मोबाईल (Pune Crime News) चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी महिलेचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे खून (Pune Murder) झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी आरोपींचे नाव आहे. पुण्यात खुनाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुण्यातील बुधवार पेठेत ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात ही फिरस्ता असून तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्याव्यसाय करतो. 10 – 15 दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता़ हा मोबाईल थोरात ने चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने व गौरव यांनी थोरात बाई कडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने थोरात खाली कोसळली पडली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन दोन जणांना अटक केली आहे.
खूनाचं सत्र सुरुच
10 फेब्रुवारीला पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अनिल ढमाले असं आत्महत्या करणाऱ्याचे नाव होतं. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. डोक्यात गोळी लागल्याने आकाश जाधव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या जाधव हे अत्यावस्थ आहेत. जाधव यांचे बालेवाडी हाय स्ट्रीट येथे ज्वेलर्स चे मोठे दालन असून ढमाले याने अनेक महिन्यांचे भाडे थकीत ठेवलं होतं आणि यातूनच हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आता समोर आली.
पिस्तूल धारकांवर पोलिसांची करडी नजर
मागील महिन्याभरात राज्यभरात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या. त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अशाच काही घटना राज्यातदेखील घडल्या त्यामुळे आता पिस्तूल धारकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणाकडे बेकायदा पिस्तूल आहे? किती गुन्हे दाखल आहे? कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहे? पिस्तुलचा वापर नेमका कोणत्या शहरात आणि कशासाठी केला आहे? या सगळ्याची माहिती घेतली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे हे गुन्हेगार आता नेमकं काय करतात? याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे.
इतर महत्वाची बातमी-