एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी बावनकुळे मैदानात; मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी बारणे यांचा विजय महत्वाचा म्हणत कार्यकर्त्यांना बजावलं!

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय भाजपसाठी महत्त्वाचा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना बजावले.

पुणे : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Loksabha Consituency) महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचा विजय भाजपसाठी महत्त्वाचा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजप कार्यकर्त्यांना बजावले. मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल पुण्यात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. महायुतीच्या जागा वाटपात मावळची जागा शिवसेनेकडेच कायम राहिल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगितली.

बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती खूप जुनी आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही आपल्याला अडीच वर्षे विरोधात बसावे लागले होते. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे धाडस व त्याग केल्यामुळे आपण राज्यात पुन्हा सत्तेत आलो, हे कदाचित विसरून चालणार नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतला असून त्याचे पालन करीत आपण सर्व मित्र पक्षांना एकत्र घेऊन काम करणे आवश्यक आहे. 

मावळचीच काय तर रामटेकची जागा देखील महायुतीत शिवसेनेला सोडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अब की बार चार सौ पार' हे लक्ष्य निर्धारित केले आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही किंतु-परंतु मनात न ठेवता झोपून देऊन काम केले पाहिजे. मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मावळात धनुष्यबाण हे चिन्ह आहे, हे खरोखर जाऊन मतदारांना सांगा व बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

खासदार बारणे यांनी त्यांची भूमिका भाजप कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली. 'मी आत्तापर्यंत महायुती म्हणून चार निवडणुका एकत्र लढवल्या आहे. चिंचवड विधानसभेची निवडणूक व लोकसभेची ही तिसरी निवडणूक मी लढवत आहे. माझ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मला खूप मोठी मदत केली आहे. त्याची जाणीव मी देखील सातत्याने ठेवली आहे. आतापर्यंत कोणतेही चुकीचे काम मी केलेले नाही. मध्यंतरी काही काळ विरोधात बसावे लागले तरी आपण कधीही भाजपच्या विरोधात वक्तव्य केले नाही. पक्षीय दृष्टिकोन डोळ्यापुढे न ठेवता आपण सर्वांची कामे केली,' याकडे बारणे यांनी लक्ष वेधले.

कोविडच्या काळात खासदारांना निधी मिळाला नव्हता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. पुणे जिल्ह्याच्या निधी वाटपाची जबाबदारी बाळा भेगडे यांच्यासह काही भाजपच्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे या संदर्भातील आरोप गैरसमजुतीतून आहेत. या व्यतिरिक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना काही शंका असतील तर त्या देखील चर्चेतून दूर केल्या जातील, अशी ग्वाही बारणे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar : मोठी बातमी! इंदापुरात शरद पवारांना धक्का, कट्टर समर्थक सोनाईचे माने कुटुंब अजित पवारांसोबत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणारRamdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणीManish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटनNarendra Modi Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Embed widget