Deenanath Mangeshkar Hospital Pune: वर्षाला 1 रुपये भाड्याने जमीन, मग्रूर मंगेशकर रुग्णालयाला खैरात का, राज्य सरकारच्या निर्णयाने वादंग!
Deenanath Mangeshkar Hospital Pune: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी नाममात्र दारात वार्षिक भाडेतत्त्वावर जमीन दिली होती.

Deenanath Mangeshkar Hospital Pune पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital Pune) सध्या वादात सापडलंय. तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने 20 लाखांची मागणी केली होती. पण अडीच लाख भरायला तयार असूनही रुग्णालयाने दाखल करुन घेतली नाही, अशी तक्रार भाजप आमदार अमित गोरखेंनी केली आहे. दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातून दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, पण तनिषा भिसेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला फोन करूनही रूग्णालय प्रशासनाने ऐकून घेतलं नसल्याची बाब समोर आलीये, यावर आता रूग्णालय प्रशासन स्पष्टीकरण देणार का असा सवाल उपस्थित होत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी नाममात्र दारात वार्षिक भाडेतत्त्वावर जमीन दिली होती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेंडिकल रिसचं सेंटरला ही जमीन देण्यात आली. ट्रस्टन मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 795 चौ. मीटर जमीनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली होती. त्यानुसार ही जमीन त्यांना वार्षिक 1 रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास मंजूरी देण्यात होती. या मंत्रिमंडळ निर्णयावरून आता मोठा वादंग निर्माण झाला आहे.
मग्रूर मंगेशकर रुग्णालयाला खैरात का?
तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्यानंतर फक्त पैशाची हाव असणाऱ्या मग्रूर हॉस्पिटलला नाममात्र दरात जमीन देण्याची गरज काय? असल्याचा सवाल आता विचारला जात आहे. यावरून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. आता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाम मात्र एक रुपया भाड्याने दिली आहे. यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. आता दिलेल्या जमिनीची किंमत सध्याच्या बाजार भावाने कमीत कमी 10 कोटी रूपये तरी असेल. रुग्णालयांने मात्र 10 लाख रूपये आगाऊ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावल्याने संताप व्यक्त केला जातोय. 
























