Baramati plane crash news : बारामतीत प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं
Baramati plane crash news : बारामती तालुक्यातील कटफल (Katfal) येथे शिकाऊ विमान कोसळलं. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये पायलट शक्ती सिंग यांना किरकोळ दुखापत झाली.
बारामती, पुणे: बारामती तालुक्यातील कटफल (Katfal) येथे शिकाऊ विमान कोसळलं. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये पायलट शक्ती सिंग (Shakati Singh) यांना किरकोळ दुखापत झाली. बारामतीत पायलटना ट्रेनिंग दिलं जातं. यादरम्यानच ही दुर्घटना घडली.
नेमकं काय घडलं?
कटफल इथे वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. अनेक पायलट इथे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊन तयार होतात. गेल्या काही दिवसापासून इथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुणे आणि शेजारील जिल्ह्यातही या विमानांच्या घिरट्या पाहायला मिळतात. आजही असंच ट्रेनिंग सुरु होतं. या ट्रेनिंगदरम्यान कटफलमध्ये विमान कोसळलं. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले आहेत. सुदैवाने ही दुखापत गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय स्थानिक नागरिकही अपघातस्थळी दाखल झाले. विमान कोसळलं त्या ठिकाणी झाडंझुडपं, गवत दिसत आहेत. अपघातग्रस्त विमान आकाराने छोटं होतं. पण या अपघातामुळे विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. विमानाच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.
हा अपघात नेमकं कशामुळे घडला, प्रशिक्षणार्थी पायलटकडून काही चूक झाली का, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. त्याबाबतची चौकशी लवकरच होईल. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
सांगलीच्या आकाशात विमानांच्या घिरट्या
दरम्यान, तिकडे सांगली जिल्ह्यातील अनेक भागात कालपासून आकाशात विमानाच्या घिरट्या सुरू आहेत. काल आटपाडी भागात आणि आज तासगाव ,सांगली भागात विमानाने घिरट्या घातलेल्या नागरिकांना दिसून आल्या. बारामतीच्या प्रशिक्षण केंद्राची ही शिकाऊ विमाने असल्याची माहिती समोर येत आहे. कमी उंचीवरून ही विमाने आकाशात घिरट्या घालत आहेत.
आटपाडी शहरावरून काल सकाळपासून विमानाने सुमारे दोन तासाहून अधिक काळ कमी उंचीवरून घिरट्या घातल्या.हे विमान बारामती येथील प्रशिक्षण केंद्राचे असल्याची माहिती आहे. आज तासगाव आणि सांगली शहरातील काही भागात आकाशातून विमाने तशाच पध्दतीने आणि कमी उंचीवरून घिरट्या घालत असल्याने नागरिकामध्ये ही विमाने आणि त्यांच्या घिरट्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
संबंधित बातम्या
Canada Plane Crash : कॅनडातील विमान दुर्घटनेत वसईच्या पुञाने गमावला जीव, पायलट होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं