(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe on Ajit Pawar : मला सेलिब्रिटी खासदार म्हणून हिणवले, पण मी 3 वेळेस संसदरत्न मिळालेला खासदार; अमोल कोल्हेंचं अजितदादांना चोख प्रत्युत्तर
Amol Kolhe on Ajit Pawar : सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान अजित पवार यांच्या टीकेला अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Amol Kolhe on Ajit Pawar : सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान अजित पवार यांच्या टीकेला अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. " अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी अभिनेता गोविंदा, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी या सेलिब्रिटींची उदाहरणे दिली आणि जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो, असं अजित पवार म्हणाले. मात्र, या सेलिब्रिटींमध्ये आणि माझ्यात मोठा फरक आहे. यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. मात्र, मला 3 वेळेस संसदरत्न मिळालेला आहे. तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे", असं प्रत्यत्तर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.4) माझ्यावर भाष्य केलं. खरतर ते मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने उत्तर देणे उचित नाही. परंतु त्यांनी माझ्याबाबत वैयक्तिक भाष्य केलं, त्याविषयी उत्तर देणे मला क्रमपाप्त आहे. अजित पवारांनी ज्या सेलिब्रिटी खासदारांची उदाहरणे दिली, त्यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी यावेळी अभिनेता गोविंदा, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी या सेलिब्रिटींची उदाहरणे दिली. मात्र, यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. मला 3 वेळेस संसदरत्न मिळालाय, असंही कोल्हे यांनी नमूद केलं.
तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी
शिरुर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनतेचे प्रश्न मांडत असताना तब्बल पहिल्याच टर्ममध्ये मला 3 वेळेस संसदरत्न पुरस्कार मिळाला. माझ्याकडे राजीनामा देणार असल्याचे बोलून दाखवले, असं अजित पवार म्हणाले. पण जर राजीनामा देण्याच्या विचारात होतो तर संसदेत उपस्थित नव्हतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणे सोडलं होतं का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केलाय. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील खासदाराची कामगिरी तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे, हेही रेकॉर्ड आपण तपासून पाहावे.
शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना मीच राबवत होतो
अमोल कोल्हे म्हणाले, सातत्याने सेलिब्रिटी खासदार देऊन चूक केली असं अजित पवार म्हणत आहेत. मग माझा त्यांना सवाल आहे की, ही जर चूक होती तर मला पक्षात ये यासाठी दाहा वेळा आमंत्रण कशाला पाठवली? शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना मीच राबवत होतो. विधानसभेच्या प्रचारात देखील आपण एकत्र होतो. तुमची शिखर बँक प्रकरणात चौकशी सुरु असताना देखील आम्ही ही यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने पूर्ण केली.
इतर महत्वाच्या बातम्या
फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या,अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील; जरांगेंचा इशारा