एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदी आजच्या काळातील चाणक्य : अमित शाह
भारतीय जनता पक्ष घराणेशाहीला कायम विरोध करत आला आहे, असं सांगत अमित शाह यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर निशाणा साधला.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत. कदाचित त्यांना हे माहितही नाही. त्यांनी देशासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केलं आहे, अशा शब्दात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मोदींचं कौतुक केलं.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी काल अमित शाह पुण्यात आले होते.
'आर्य चाणक्य- जीवन आणि कार्य' या विषयावर बोलताना शाह यांनी विविध पैलूंवर भाष्य केलं. 'आर्य चाणक्य यांनी घराणेशाहीला कायम विरोध केला. राज्य चालवण्याची जबाबदारी ही सक्षम हातात पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत. कदाचित त्यांनाही याचा अंदाज नसेल. मोदींनी देशासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे.' असं शाह म्हणाले.
पुण्यात अमित शाह आणि बाबासाहेब पुरंदरेंची भेट
भारतीय जनता पक्ष घराणेशाहीला कायम विरोध करत आला आहे, असं सांगत अमित शाह यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर निशाणा साधला.भाजपाध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्र्यांसह पालख्यांच्या दर्शनाला
पुणे दौऱ्यात अमित शाहांनी भाजपच्या संपर्क फॉर समर्थन अभियाना अंतर्गत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचीही भेट घेतली. पुणे मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं अमित शाह यांनी दर्शन घेतलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement