Ajit Pawar NCP: दोन्ही राष्ट्रवादी कायमच्या पुन्हा एकत्र येणार? पुण्यातील पत्रकार परिषदेतील तो प्रश्न अन् अजितदादांचं क्षणार्धात उत्तर, म्हणाले, 'तुझ्या तोंडात साखर पडो...'
Ajit Pawar NCP: एकमेकांच्या विरोधात विधानसभा, राज्यसभा निवडणूक लढल्यानंतर पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेला पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले आहेत,

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांनी पक्षातील आमदार, खासदारांसह काही महिनियांपूर्वी बंड केलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली होती, त्यावेळी अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार(Sharad pawar) यांची साथ सोडत अजित पवार (ajit Pawar) यांना पाठिंबा दिला होता. अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना-भाजप यांच्या युती सरकारला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या या निर्णयानंतर पक्षाचे दोन गट पडले. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरा राष्ट्रवादी शरद पवार गट, त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील अजित पवार यांना दिलं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. या सर्व घडामोडींमनंतर एकमेकांवर टीका केल्यानंतर, एकमेकांच्या विरोधात विधानसभा, राज्यसभा निवडणूक लढल्यानंतर पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेला पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले आहेत, येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच काल (शुक्रवारी) अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यमुळे चर्चांना उधाण आले आहे.(ajit Pawar)
Ajit Pawar: तुझ्या तोंडात साखर पडो
महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काल (शुक्रवारी) पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतल भाजपवर देखील हल्लाबोल केला. या वेळी अजित पवार यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवार यांचे फोटो तुमच्या फ्लेक्सवर आहेत, हे आत्तापुरतं आहे की, कायमस्वरुपी असंच राहणार आहे? या पत्रकाराच्या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता या प्रश्नाला उत्तर देताना तुझ्या तोंडात साखर पडो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या या उत्तरामुळे पुन्हा एकदा आता दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणार का? अशा चर्चांणा उधाण आलं आहे.
Vijay Wadettiwar: शरद पवार यांचे 8 खासदार NDA मध्ये सामील होण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे बारामती दौऱ्यावरती होते, यावेळी त्यांनी अजित पवार, शरद पवार यांच्यासह परिवारातील सर्वजण हजर होते, त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांसह अजित पवारांवर हल्लाबोल केला होता, अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार यांचे 8 खासदार NDA मध्ये सामील होण्याची शक्यता असल्याची महाराष्ट्रात चर्चा आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली होती, शरद पवार यांचे राजकारण आतापर्यंतच पुरोगामी विचारांचं मात्र या प्रकारामुळे त्यांच्या भूमिकेला गालबोट लागल्याचं आणि पवार साहेब विचारधारेला हरताळ फासून भाजपला मदत करतील का अशी देखील चर्चा असल्याचं वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं होतं, पुण्यातील युती ही भविष्यातील राजकारणाची पहिली पायरी तर नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी पवारांच्या भूमिकेवर उपस्थित प्रश्नचिन्ह केले होते, पुण्यात जर तडजोड होत असेल तर सगळ्याच ठिकाणी तडजोड होऊ शकेल, शरद पवारांचे अनेक आमदार-खासदार अजित पवारांच्या संपर्कात असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























