एक्स्प्लोर
पोटची मुलगी नसल्याची खंत, पण सुनांना मुलींसारखंच वागवेन : अजित पवार
पिंपरी चिंचवड : मुलगी नसल्याची खंत वाटते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
"खरं प्रेम काय असतं, हे मुलीकडून शिकलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरी मुलगी असली पाहिजे. मला दोन मुलं असल्याने तिसरा चान्स घेता आला नाही. पण हरकत नाही. सुना येतील, त्या माझ्या मुलीसारख्याच असतील. त्यामुळे सुनांना मी मुलीसारखीच वागणूक देईन.", अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात स्त्री कर्तुत्वाला सलाम केला जातो आहे. समाजाला खऱ्या अर्थान् समृद्ध करणारी मुलगी आपल्या पोटी नसल्याचे दुःख अनेक जण व्यक्त करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुलगी नसल्याने खंत व्यक्त केली. यावेळी अजित पवार यांनी 'बेटी बचाव' या अनोख्या समूहशिल्पाच लोकार्पण केलं.
VIDEO : पाहा अजित पवार काय म्हणाले? :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement