Ajit Pawar : सकाळी 7 वाजता बैठक; अधिकारी अन् आमदार येण्याआधीच अजितदादा पोहचले अन्...
अजित पवारांनी पालकमंत्री झाल्यापासून विविध विभागांच्या आढावा बैठकीचा धडाका लावला आहे. आज सकाळी पुण्यात 7 वाजल्यापासून बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र या बैठकीसाठी अजित पवार अधिकाऱ्यांच्या अर्धा तास आधीच पोहचले आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीची (ajit pawar) सगळीकडे चर्चा होते. सकाळीच ते कामाला सुरुवात करतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज तसाच प्रत्यय पुण्यात आला आहे. अजित पवारांनी पालकमंत्री झाल्यापासून विविध विभागांच्या आढावा बैठकीचा धडाका लावला आहे. आज सकाळी पुण्यात 7 वाजल्यापासून बैठका आहे. मात्र या बैठकीसाठी अजित पवार अधिकाऱ्यांच्या अर्धा तास आधीच पोहचले आहे. त्यामुळे उशीरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
अजित पवार साधारण दर शुक्रवारी आढावा बैठक घेत असतात. त्यात ते सकाळी सात वाजेपासूनच बैठकांचं नियोजन करत असतात. त्यामुळे कायम उशीरा येणाऱ्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडते. अजित पवारांची बैठक म्हटलं की अधिकारी वेळेत येण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आज अजित पवार अधिकाऱ्यांच्यापूर्वीच बैठकस्थळी दाखल झाले होते.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्येही बैठका घेणार आहे. पालकमंत्री झाल्यावर ते पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहे. विविध विभागाचा आढावा घेणार आहे. पालकमंत्री झाल्यावर अजित पवार पहिल्यांदाच येत असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार आणि कोणाला धारेवर धरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मागच्या शुक्रवारीदेखील अजित पवारांनी विविध विभागाच्या बैठकी घेतल्या होत्या. त्यावेळी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचनादेखील केल्या होत्या. पुण्यात सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचादेखील त्यांनी आढावा घेतला होता. पोलीस आयुक्त आणि ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांना बोलावून घेत विविध प्रश्न विचारले होते. त्यावेळी या ड्रग्ज विळख्यातून पुण्याला कसं बाहेर करता येईल, यावर विचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नीट काम करा, दुर्लक्ष झाल्यास....
त्यासोबतच या सबतच त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. पाणी पुरवठा योजना यशस्वी होण्याच्यादृष्टीने कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश दिले होते. त्यासोबतच आरोग्य सुविधांसाठी राज्यस्तरावरून अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. येत्या मार्च अखेरपर्यंत दोन्ही महापालिका क्षेत्रात खाटांची संख्या वाढवावी. ससून रुग्णालयात अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा सर्वसामान्य रुग्णाला लाभ झालाच पाहिजे. यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशाही सूचना दिल्या होत्या.
इतर महत्वाची बातमी-