Ajit pawar On Rohil Pawar : रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, अजित दादा स्पष्टच बोलले...
अजित पवार आणि सुप्रिया सुळेनंतर भावी मुख्यमंत्रीच्या रांगेत त्यांच्या कुटुंबातील रोहित पवार आले आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : अजित पवार (ajit pawar)आणि सुप्रिया सुळेनंतर भावी मुख्यमंत्री रांगेत त्यांच्या कुटुंबातील रोहित पवार आले आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्याच्या या बॅनर्सवर उपमुख्यंत्री अजित पवारांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाचे बोर्ड लावायचे याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र जो पर्यंत 145 ही मॅजिक फिगर जो गाठू शकत नाही, तोवर हे दिवा स्वप्न स्वप्नचं राहतं, असं ते म्हणाले.
बॅनरवर बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, आता कोणीच शिल्लक राहणार नाही, सगळेच भावी मुख्यमंत्री म्हणून आपापले फ्लेक्स लावतील. मी मागेच म्हणालो होतो, असे फ्लेक्स लावून काही होत नाही. कोणी कोणाचे बोर्ड लावायचे याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र जोपर्यंत 145 ही मॅजिक फिगर जो गाठू शकत नाही, तोवर हे दिवा स्वप्न स्वप्नचं राहतं.
"त्यामुळं सामान्यांना ही तिथं जावंसं वाटतं"
लालबाग गणपतीजवळील घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्या कानावर ही बाब पडली. काही भगिनींनीना तिथं भोवळ आली, त्यानंतर तशी परिस्थिती झाली. लालबाग राजा देश पातळीवर प्रसिद्ध झाला आहे. अशातच व्हीआयपी जातात. त्यामुळं सामान्यांना ही तिथं जावंसं वाटतं. हा लालबागचा राजा हा जागरूक गणपती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं तिथं दर्शनाला मोठी गर्दी होती. व्हीआयपी साठी वेगळी आणि सामान्यांसाठी वेगळी रांग केलेली आहे. तरी ही अशी परिस्थिती उद्भवली. गणेश मंडळांची ही जबाबदारी असते आणि सरकार म्हणून आमचे पोलीस त्यांना सहकार्य करत आहेत.
अमित शहांच्या दौऱ्यावेळी गैरहज होतो कारण...
काल अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अजित पवार उपस्थित नव्हते. त्यावर विचारलं असता ते म्हणाले की, मी काल दिवसभर बारामतीमध्ये होतो. आज पिंपरीत आणि उद्या पुणे शहरात दिवसभरात असेन. बारामतीचे नेतृत्व करतोय तेव्हापासून मी वर्षानुवर्षे त्या पाच संस्थांच्या बैठकांना असतो. ते नियोजन पंधरा दिवसांपूर्वी ठरलेला होता. त्याबाबत मी तसं वरिष्ठांना कळवलं होतं.
145 ची मॅजिक फिगर गाठण्याचे दिवा स्वप्न तुम्ही पूर्ण कराल का?
अजित पवार म्हणाले की, माझं काम सुरु आहे. 1991 ला मला या शहराने खासदार केलं. तेव्हापासून मी फक्त आणि फक्त काम करतो. माझं काम हेच ध्येय आहे. अलीकडे वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे, मी तिकडं दुर्लक्ष करतो. मी फक्त काम एक्के काम करतो.
कायद्याच्या अधीन राहून आरक्षण देणार...
मनोज जरांगे मराठा आरक्षण सुरूच ठेवणार आहे त्यावरदेखिल अजित पवारांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोणी काय बोलावं हे ज्याचा त्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण दिलं जाईल, पण इतर समाजांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. कायद्याच्या अधीन राहून आरक्षण दिलं जाईल.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : मुलगा लिफ्टमध्ये अडकला, आरडा ओरडा झाला, अग्निशमन दलाचे जवान आले अन्...