एक्स्प्लोर

Pune News : 140 प्रवाशांनी भरलेलं विमान पुणे विमानतळाच्या धावपट्टीवरून भुवनेश्वरला निघालं, वेग पकडताच उजव्या इंजिनला पक्षी धडकला अन्...

Pune Airport Bird Hit : विमानतळांवर वारंवार कुत्रे बिबट्या,पक्षी, येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासाच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पुणे: पुणे विमानतळावर पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. विमानतळांवर वारंवार कुत्रे बिबट्या,पक्षी, येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासाच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे विमानतळवरून भुवनेश्वरला उड्डाणाच्या तयारीत असलेलं 1098 हे विमान रद्द करावं लागलं आहे. पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेड निकामी झाले, हा प्रकार वेळीच पायलटच्या लक्षात आल्यामुळे विमान उड्डाण रद्द करण्यात आले. (Air India Express plane suffers bird hit before take-off at Pune Airport)

पुण्याहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1098 विमानाला उड्डाणादरम्यान पक्षी धडकल्याची घटना बुधवारी (7 ऑगस्ट) घडली. या विमानामध्ये 140 प्रवासी होते. धावपट्टीवर वेग घेत असताना उजव्या बाजूच्या इंजिनाला पक्षी आदळल्यामुळे विमानाचे पाच ब्लेड निकामी झाले. पायलटच्या सतर्कतेमुळे वेळेवर उड्डाण थांबवण्यात आले आणि मोठा अपघात टळला. मात्र परिणामी, हे उड्डाण रद्द करण्यात आले आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

याच विमानाच्या सीट क्रमांक 22 डी वरील प्रवासी मोहम्मद नदीम यांनी TOI शी बोलताना सांगितले की, "इंजिनने वेग वाढवल्यानंतर त्यातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यानंतर लगेचच, पायलटने ब्रेक दाबले आणि विमान थांबले. ब्रेक इतके जोरात लागले की काही प्रवाशांचे फोन खाली पडले आणि एका महिलेच्या हातातून तिचं मूल जवळजवळ खाली पडलं."

विमानाचा वेग नेहमीच पायलट ठरवतो. वेगाचे तीन प्रकार आहेत - V1 (निर्णय गती), VR (रोटेशन गती) आणि V2 (टेक-ऑफ सुरक्षा गती). V1 ही कमाल वेग मर्यादा आहे ज्यावर पायलट आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे टेक-ऑफ थांबवू शकतो.

नेमकं काय घडलं?

एअर इंडिया एक्सप्रेसचं IX-1098 हे विमान सायंकाळी 4:05 वाजता भुवनेश्वरकडे रवाना होणार होतं. विमानात दीडशेपेक्षा अधिक प्रवासी होते. नियोजित वेळेनुसार विमान धावपट्टीवर गेलं आणि उड्डाणासाठी वेग घेत असतानाच उजव्या इंजिनात पक्षी आदळला.
पायलटच्या त्वरित लक्षात आलं आणि उड्डाण थांबवलं, विमान पुन्हा पार्किंग बेमध्ये आणलं. जर हा प्रकार हवेत घडला असता, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, अशी माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिली आहे.

पुणे विमानतळावर गेल्या पाच वर्षांमध्ये 145 बर्ड हिटच्या घटना, तर 2025 मध्ये आतापर्यंत 12 घटना घडल्या आहेत. बुधवारी घडलेली ही बारावी घटना आहे. यामुळे पुणे विमानतळावरील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
Embed widget