Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या 'या' कुटुंबाची सोशलवर हवा! जाणून घ्या, हा काय प्रकार?
Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या 'when people meet because of you and become a fam!' या इंस्टा स्टोरी मागची भन्नाट कहाणी!
Sai Tamhankar : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या लहानथोरांचा चमू हा जानेवारी 2016 पासून एका खास व्यक्तीच्या प्रेमापोटी करणानिमित्त एकत्र जमतो. आणि याच निमित्ताने बऱ्याच साऱ्या सामाजिक आणि इतर क्षेत्रात विविध उपक्रमाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करतो.अर्थातच ती व्यक्ती 'निमित्त' म्हणजे सुप्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर! नुकतंच सईने इंस्टावर एक स्टोरी शेयर केली ज्यात तिने लिहलय 'when people meet because of you and become a fam!'
सईच्या नावाने एकत्र आलेलं हे मित्रमंडळ म्हणजेच तिचे 'सईहोलिक्स' कुटुंब...या स्टोरी मध्ये असलेली सगळी मंडळी 2016 ते आजतागायत एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आहेत, आणि याच सईहोलिक्स कुटुंबातील एका सदस्यांचं लग्न नुकतंच पुण्यात पार पडलं आणि कित्येक स्टोरीज वर हा फोटो झळकू लागला...
सईने आपल्या कुटुंबातील सदस्याला शुभेच्छा देत एक सईहोलिक्स चा घट्ट ऋणानुबंध जमलेलाय याबद्दल एक गोड इन्स्टा स्टोरी शेयर करून आनंद व्यक्त केलाय. स्टोर शेयर करताना सईने 'when people meet because of you and become a fan!' असं लिहल्यावर, हा कोणता परिवार आहे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. हा परिवार सईच्या तत्वांवर आणि विचारांवर चालणारा हा फॅनक्लब असल्याचं पाहायला मिळतं. आणि याच 'सईहोलिक्स' कुटुंबा बद्दल तिने स्टोरी शेयर केल्याचं पाहायला मिळतं.
वास्तविक अनेक फॅनक्लब हे प्रमोशनसाठी उभी होतात मात्र काही कुटुंब होतात, आणि कलाकारांच्या साठी ही आनंदाची गोष्ट असल्याचं पाहायला मिळत, सई ताम्हणकर नेहमी तिच्या या सईहोलिक्स चं कौतुक करताना दिसते, एबीपी माझाच्या नुकत्याच झालेल्या 'महा कट्टा' वर बोलताना सांगितलं होतं की तिची ऊर्जा स्थान असलेली ही मंडळी आहेत, एक अदृश्य फौज जी सईच्या कायम पाठीशी राहिलेली आहे, चाहत्यांच्या सुखात सहभागी होण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य आहे' असंही तिने सांगितलं होतं.
सई आगामी फिल्मच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्याने लग्नाला उपस्थित नव्हती मात्र तिने कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाला मात्र शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतं. आज बिग बी,शाहरुख,आमिर खान, नाना-मकरंद, ते सयाजी शिंदेच्या चाहत्यांच् गृमिंग जस सामाजिक कामात असल्याचं पाहायला मिळतं! त्याच सोबत असंच सई होलिक्स मंडळी देखील आपल्या उपक्रमांची छाप आणि फॅमिली ऋणानुबंध कायम ठेवणार शंका नाही! आगामी उपक्रमकडे चाहत्यांचे लक्ष लागले असल्याचं पाहायला मिळतं!
ही बातमी वाचा :
Sai Tamhankar : 'होय आम्ही वेगळे झालोय,' सई ताम्हणकर आणि अनिश जोगचं ब्रेकअप, अभिनेत्रीनेच दिली कबुली