पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात कोरोनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात असल्याची माहिती आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 17 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
पुणे शहरात परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी आलेल्या स्वाईन फ्लूचा सुद्धा पुण्यामध्ये जास्त प्रभाव दिसून आला होता, अगदी त्याचप्रमाणे यंदाही कोरोनाचं प्रमाण पुण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्यांना 24 तासासाठी संस्थात्मक क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. क्वॉरंटाईनसाठी जी व्यवस्था करण्यात आली होती त्यात 250 जणांची भर करण्यात आली आहे, यापूर्वी 550 जणांना क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था होती.
परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्याची नवी व्यवस्था बालेवाडी परिसरात केली गेली आहे. क्वॉरंटाईन केल्या गेलेल्या नागरिकांपैकी जर कुणी पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा उपचार टाळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाची चाचणी सुरू असलेले रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेल्याच्या काही घचना घडल्या आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणखी काही नागरिकांना त्याची लागण झाली. इटलीवरून परतलेल्या एका भारतीय महिलेच्या अशाच निष्काळजीपणामुळे इतरांनाही बाधा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील क्वॉरंटाईन केलेल्यांपैकी कुणी पळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
Rajesh Tope On coronavirus | राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती स्थिर : राजेश टोपे
पुढील सात दिवस अत्यावश्यक सरकारी कार्यालयं वगळता इतर कार्यालयं बंद राहतील अशी माहितीदेखील आयुक्तांनी दिली. आरटीओकडून दिले जाणारे नवे लायसन्स 31 मार्चपर्यंत दिले जाणार नाहीत. आरटीओ आणि आधार कार्ड सेंटर्स काही काळासाठी नागरिकांसाठी बंद असतील कारण या ठिकाणांवर होणारी लोकांची गर्दी जास्त प्रमाणात आहे. नव्या वाहनांचं रजिस्ट्रेशन आरटीओमध्ये जाऊन न करता संबंधित वाहनांच्या शो-रुममध्ये जाऊन करू शकता येणार आहे. लायसन्स रिन्यू करायचं असल्यास ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं अशी सूचनादेखील देण्यात आली आहे.
कोरोनापासून सावधान राहण्यासाठी सॅनिटायझर्सची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि याचाच फायदा घेत कमी दर्जाचं सामान वापरून फेक सॅनिटायझर बनवण्यात येत होतं, अशाच खराब दर्जाचं एक लाखाचं सॅनिटायझरचं औषध निरीक्षक कार्यालयाने सामान जप्त करण्यात आलं आहे.
Coronavirus | कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पहिला बळी, कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू
संबंधित बातम्या
- Coronavirus | कोल्हापुरात कोरोना संशयित वृद्ध नागरिकाचा मृत्यू
- Coronavirus | शेतकरी कर्जमाफी योजनेलाही कोरोना व्हायरसचा फटका
- Coronavirus | पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला, राज्यातील आकडा 33 वर
- राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर, मुंबईत आजपासून जमावबंदी लागू, प्रशासनासमोर आव्हान
- इराणमधल्या अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले
- #Coronavirus | मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
- बेळगावमध्ये दोघांची कोरोना वॉर्डमध्ये तपासणी