इराण आणि इराकमधील मुस्लिम धर्मस्थळांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील 44 भाविक 21 फेब्रुवारीला भारतातून तेहरानला पोहचले होते . मात्र याच काळात जगभर कोरोना व्हायरसची दहशत असल्याने सर्वच देशांनी आपल्या सीमा सील केल्या होत्या. त्यामुळे या भाविकांना तेहरान मधून बाहेर पडणे अशक्य होते. यानंतर लगेचच या भाविकांनी भारतात परत येण्याचे प्रयत्न सुरु केले. यानंतर त्यांच्या सुटकेसाठी अनेक राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. अखेर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि अखेर भारतीय वैद्यकीय पथकाने भाविकांची तेहराणामध्ये आरोग्य तपासणी केल्यावर त्यांच्या परतीचा मार्ग सुकर बनला.
शरद पवार आणि एबीपी माझामुळे सुटका झाल्याची प्रतिक्रिया साद ट्रॅव्हल्सचे मालक मुन्ना सय्यद यांनी दिली. या सर्व अडकलेल्या भाविकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
Coronavirus | इराणमधल्या 234 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मध्यरात्री परतलं
इराणच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे 97 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 611 झाली आहे. इराणमध्ये 12,729 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पश्चिम आशियामध्ये इराणला कोरोनाता सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक वरिष्ठ अधिकारीही बळी पडले आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर दोन आठवड्यांसाठी बंदी घातली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात एकूण 31 कोरोनाग्रस्त रुग्ण
#Coronavirus | मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
बेळगावमध्ये दोघांची कोरोना वार्डात तपासणी