पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 16 झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये २७ कोरोना संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.
परदेशातून पुण्यात आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी होणार आहे. रविवारी 90 जण परदेशातून आले होते त्यापैकी 7 जणांना त्रास होत होता. त्या सर्वांची नायडू रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे.
Coronavirus | Deepak Mhaisekar PC | पुण्यात जमावबंदी लागू पण संचारबंदी नाही : दीपक म्हैसेकर
आत्तापर्यत बंदी घातलेल्या देशांच्या सात देशांमध्ये आणखी तीन देशांचा समावेश केला जाईल. त्यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन देशांमधील प्रवेशांवर बंदी घालणार असल्याचं यावेळा सांगितलं. तसेच पुणे महापालिकेच्या 125 तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 50 टीम घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. आत्तापर्यंत 15803 घरांमध्ये आतापर्यंत सर्वे करण्यात आलं असल्याची माहिती दिपक म्हैसकर यांनी दिली.
पुण्यात जमावबंदी आदेश लागू केला जाईल पण त्यात संचारबंदी नसेल. यामध्ये काही बंधनं असतील. त्यांचं उल्लंघन झालं तर पुढची कारवाई केली जाईल असं दिपक म्हैसकर यांनी सांगितलं. तसेच लोकांनी शासनाला सहकार्य करायचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.
तर ज्या ज्या इंडस्ट्रीजना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं अशा सुचना देण्यात आल्याचं म्हैसकर यांनी सांगितल. आय टी इंडस्ट्रीजमधील कंपनी अधिकाऱ्यांशी बोलून पुन्हा एकदा त्यांना वर्क फ्रॉम होम राबवण्याबाबत सुचना देणार आहोत. तसेच कंपन्यांनी आपल्या कोणत्याही कर्मचार्यांना परदेशात पाठवू नये असही दिपक म्हैसकर बोलले. इंडस्ट्रीजमधील उत्पादन थांबवाव अशी कोणतीही परिस्थिती आतातरी नसल्याचं नमूद केलं.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 39 वर पोहोचला
राज्यातील स्थिती :-
पिंपरी चिंचवड - 9
पुणे- 7
मुंबई - 6
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड, ठाणे, अहमदनगर,औरंगाबाद - प्रत्येकी 1
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - 39
संबंधित बातम्या :