पुणे : जुना मुंबई पुणे महामार्गावर अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच एका भीषण अपघातामुळे जुना पुणे मुंबई महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जुना मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील खंडाळा येथे भीषण अपघात झाला आहे.एका अवघड वळणावर पती पत्नी मोटारसायकलवरून नवी मुंबई येथून पुण्याच्या दिशेला जात असताना खासगी बस खाली येऊन अपघात झाला.
या अपघातात सुरेखा आनंद सणस ही महिला जागीच ठार झाली असून पती आनंद सहदेव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार झारा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय .घटनास्थळी लोणावळा शहर पोलिसांनी जखमी आनंद सणस यांना रुग्णालयात दाखल केलं असून सुरेखा सणस यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केलाय. तर बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहे. मुंबईहून पुण्याकडे दाम्पत्य निघालं होतं. मात्र मध्येच खासगी बसने दोघांना चिऱडलं. भरधाव खासगी बस थेट दोघांच्या दोघांच्या अंगावर घालती आणि पुण्याकडे निघालेल्या दाम्पत्याचा काळाने घात केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वीदेखील भीषण अपघात
दोन दिवसांपूर्वीदेखील जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला होता. यात दोन महिलांचा मृत्यू झाला होता आणि त्यासोबतच चार महिला जखमीदेखील झाल्या होत्या. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार पलटी होऊन अपघात झाला होता. हा अपघात कामशेत जवळ नायगाव येथे घडला.सीताबाई तुकाराम लालगुडे (वय 58, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ), सिद्धी संतोष तिकोने (वय 18, रा. पाटण, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. रिद्धी संतोष तिकोने (वय 14, रा. पाटण, ता. मावळ), प्रियंका संग्राम भानुसघरे, सुभद्रा किसन भानुसगरे, लता किसन पिंजन या महिला जखमी झाल्या होत्या. प्रकरणी ऋषीनाथ तुकाराम लालगुडे (वय 43, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक सुमित गुलाब पिंजन (वय 23, रा. कीनई, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस