Toilet Seva App : देशभरातील स्वच्छ्तागृहांची यादी एका क्लिकवर, पुण्यात तयार झालं अनोखं ॲप
Toilet Seva App : तुम्ही कधी पब्लिक टॉयलेट म्हणजेच सुलभ शौचालय किंवा स्वच्छतागृह ऑनलाईन शोधलंत?
Toilet Seva App: आजकाल एखादी गोष्ट जर शोधायची असेल तर तुम्ही पटकन मोबाईल उचलता आणि इंटरनेटच्या मदतीने हवं ते काही सेकंदात तुम्हाला मिळून जातं. एखादं कॅफे, हॉटेल,दुकान, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल तुम्हाला एका क्लिक वर मिळेल. पण तुम्ही कधी पब्लिक टॉयलेट म्हणजेच सुलभ शौचालय किंवा स्वच्छतागृह ऑनलाईन शोधलंत? आता काळजी नसावी कारण आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला असाल तर हे ॲप तुम्हाला तुमच्या परिसरात किती स्वच्छतागृह आहेत आणि ते किती स्वच्छ आहेत हे दाखवेल
फूड डिलिव्हरीपासून ते किराणा मालाची आणि इस्त्री वाल्यापसून ते औषधांची असे हजारांपेक्षा आधिक मोबाईल ॲप सध्या उपलब्ध आहेत. एखादं ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड केलं की आपोआप अनेक कामं सुलभ होऊन जातात पण तुम्ही कधी स्वच्छतागृह किंवा पब्लिक टॉयलेट सापडेल असं ॲप पाहिलंय? आज आम्ही तुम्हाला अशा ॲप ची माहिती देणार आहोत की ते तुम्हाला हवं त्या भागातील स्वच्छतागृहांची माहिती देईल. "टॉयलेट सेवा" नावाचे हे ॲप बनवले आहे पुण्यातील अमोल भिंगे यांनी. भिंगे हे पुण्याचे असून ते अमेरिकेत एका खाजगी संस्थेत कार्यरत आहेत. इंजिनीयर असलेली भिंगे यांना पुण्यात एक अनुभव आला आणि त्यांनी थेट त्यासंदर्भात काही तरी करण्याचे ठरवले. नेमका काय अनुभव आला त्यांना पाहूया..
बाहेरून पर्यटक म्हणून आलेले नागरिक असतील किंवा विशेषतः महिलांना अनेक वेळा स्वच्छतागृह नसल्यामुळे अडचण निर्माण होते. पुण्यात ठीकठिकाणी स्वच्छतागृह उभे केलेले आहेत मात्र अनेकांना त्याचा पत्ता माहीत नसतो. टॉयलेट सेवा हे ॲप शहरातील विविध भागात असणाऱ्या स्वच्छतागृहांचा पत्ता मिळवून देतं. इतकंच काय तर ते स्वच्छतागृह स्वच्छ आहे का नाही सुस्थितीत आहे का नाही याची माहिती देखील देतं.
नेमकं हे ॲप वापरायचं कसं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. काळजी नसावी हे ॲप वापरायला एकदम सोपे आहे. तुमच्याकडे अँड्रॉइड किंवा आय ओ एस या दोन्ही प्रणालीच्या जोरावर कुठल्या ही मोबाईल वर चालू शकतं. ॲप ओपन केल्यावर तुम्ही एखादं लोकेशन टाका आणि तुम्हाला त्या भागातील सार्वजनिक तर आहेतच पण हॉटेल, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल, तीर्थ क्षेत्र, शिक्षण संस्था या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची यादी देतं. आत्तापर्यंत या ॲप मध्ये संपूर्ण भारतातील जवळ पास दीड लाख स्वच्छतागृह यांची अपडेटेड यादी उपलब्ध आहे. पुण्याबाबत सांगायला गेलं तर शहरातील 2600 स्वच्छतागृह तुम्हाला या ॲप मध्ये सापडतील. या वर्षी जून मध्ये सुरू झालेल्या ॲप मध्ये पुढील वर्षीपर्यंत 10 लाख स्वच्छतागृहांची माहिती देण्याचा मानस भिंगे यांनी व्यक्त केला आहे.
अनेक शहरात एस टी स्टँड, रेल्वे स्टेशन, किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची स्थीती दुर्दैवी आहे. स्वच्छ्तागृह नसल्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते आणि जे उभारले आहेत तिथे जावसं वाटतं नाही, हे देखील तितकंच खरं. हे स्वच्छ्तागृह किंवा हे टॉयलेट खराब आहे हे म्हणणं अगदी सोपं आहे पण आपण त्यासाठी काही करतोय का हे देखील एकदा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.