(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milind Ekbote : समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
मिलींद एकबोटे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करत समाजाच्या भावना भडकवल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Milind Ekbote : समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करत समाजाच्या भावना भडकवल्या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद एकबोटे यांच्यासह पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह इतर 20 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
काल महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होत. असाच एक कार्यक्रम कसबा पेठ येथील पवळे चौकात देखील आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाची रितसर परवानगी न घेता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमात बेकायदेशीर जमाव जमवत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये एकूण 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 15 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मिलिंद एकबोटे यांना अटक झाली नसल्याचे माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, मागील दोन महिन्यापूर्वीच खडक पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटे यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील नातूबाग येथे 19 डिसेंबरला शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेसह सहा जणांविरोधात खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज, कॅप्टन दिग्रेंद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मिलिंद एकबोटे अडचणीत सापडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: