एक्स्प्लोर
चॉकलेटचं आमिष दाखवून 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

पुणेः चॉकलेटचं आमिष दाखवून सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी 27 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शिवणे-उत्तमनगर भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील गोडाऊनमध्ये काल रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. उमेश जाधव असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्तमनगर परिसरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील बाजूस एका इमारतीचं बांधकाम चालू आहे. आरोपी जाधव त्याच भागात तीन दिवसापूर्वी राहण्यास आला असून या साईट वर काम करत आहे, अशी माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली. जाधवने पीडित मुलाला चॉकलेट देतो, असे सांगून एका बांधकामाच्या रूममध्ये नेलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या सर्व प्रकाराची माहिती मुलाने घराच्यांना दिली. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















