एक्स्प्लोर

Pune Crime news : टॉवेल गळ्याशी घेऊन चिमुकली खेळत होती, अचानक फास बसला अन्...

पुण्यातील एका सात वर्षीय मुलीचा खेळता खेळता टॉवेलने गळा आवळून मृत्यु झाला आहे. अदिती दत्तात्रय कुलकर्णी असे या सात वर्षीय मुलीचे नाव आहे.

Pune Crime news : पुण्यातील एका सात वर्षीय मुलीचा खेळता खेळता टॉवेलने गळा आवळला गेल्याने मृत्यु झाला आहे. अदिती दत्तात्रय कुलकर्णी असे या सात वर्षीय मुलीचे नाव आहे. तिच्या जाण्याने कुलकर्णी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. कुलकर्णी कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे. परिसरातदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलं खेळत असताना डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं अशा घटनांमधून समोर येत आहे. 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगी तिच्या घराच्या खिडकीजवळ आणि हॉलमध्ये खेळत असायची. शनिवारी रात्री 5.30 च्या सुमारास खिडकीच्या ग्रीलला लटकत असताना ती टॉवेलने खेळत होती. टॉवेल तिच्या मानेला चिकटल्याने तिचा गळा दाबला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीची आई शाळेत मोलकरीण म्हणून काम करते तर तिचे वडील सुरक्षा रक्षक आहेत.  मुलीचा गळा दाबून निधन झाल्याचं झाल्याचे पाहून आजीने मदतीसाठी आरडाओरडा केला. वृद्ध महिलेची कैफियत शेजाऱ्यांनी ऐकताच ते घटनास्थळी धावले. तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या...

मागील काही दिवसांपासून मुलांच्या बाबतील घडणाऱ्या अशा धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. कधी खेळताना तर कधी नदीत पोहताना लहानग्यांचा नाहक जीव जात आहे. य घटनांमुळे अनेक कुटुंबियांवर शोककळा पसरते मात्र या सगळ्या घटना थांबवण्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतकंच नाहीतर तर आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, त्यांना टीव्ही आणि मोबाईलद्वारे काय दाखवतो हेदेखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. याची प्रत्येक पालकाने काळजी घेतली पाहिजे.

खेळता खेळता स्वत:लाच लावून घेतली फाशी...

काही दिवसांपूर्वी पिंपरीतून अशीच धक्कादायक घटना घडली होती. खेळण्यातल्या बाहुलीला फाशी दिल्यानंतर एका अल्पवयीन मुलीने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.  मुलगी आपल्या खोलीत खेळत होती. तिचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आई घरातल्या कामात व्यस्त होती. खेळता-खेळता कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून त्या बाहुलीला फाशी दिली. त्यानंतर बाहुलीचा मृत्यू झालं असं तिला भासलं आणि लगेच या मुलीनेदेखील स्वत:ला तसाच गळफास लावून घेतला होता. आईने मुलगी काय खेळत आहे हे पाहिल्यावर हा प्रकार उघड झाला आला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget