एक्स्प्लोर

डीएसके दाम्पत्याविरोधात 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र

डी एस कुलकर्णी आणि पत्नी हेमंती यांच्याविरोधात 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांची संपत्ती जप्त केल्यानंतर त्यांना आणखी एक दणका मिळाला आहे. कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसकेंवर तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळ्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. वांजपे दाम्पत्य आणि पाचपोर या तिघांनाही उद्या पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात या तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. डीएसके दाम्पत्याविरोधात 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र डीएसके आणि हेमंती कुलकर्णींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला डीएसकेंसोबत बिनसल्यानंतर केदार वांजपे स्वतंत्रपणे व्यवसाय करु लागला. डीएसके आणि वांजपे यांनी एकमेकांवर जाहीर आरोपही केले होते. मात्र डीएसकेंसोबत असताना केदार, सई आणि पाचपोर हे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत बँकांकडून कर्जरुपाने मिळालेल्या पैशाचा अपहार करण्यात सहभागी होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. एसीत वावरणारे 'हे' सेलिब्रेटी आता जेलमध्ये घामांच्या धारांत डीएसकेंची मालमत्ता फुरसुंगी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथील डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लि. कंपनीच्या नावावर असलेल्या 95 मालमत्ता शिरीष दीपक कुलकर्णी नावावरील फुरसुंगी येथील 12, मालेगाव येथील 4,  मिरज 1, रत्नागिरी 4,  नवाली तालुका पुरंदर येथील 2 दीपक सखाराम कुलकर्णी नावावारील पेरणे तालुका हवेली 3,  बाणेर येथील 2 फ्लॅट डी एस कुलकर्णी अँण्ड कंपनी (वैजयंती मुगदल) या नावावरील नाकीर्दा तालुका महाबळेश्वर येथील एक मालमत्ता अशा एकूण 124 मालमत्तांसह कुटुंबीतील विविध व्यक्तींच्या नावावर असलेली विविध बँकातील 276 खातीही गोठवण्यात येणार आहेत. आलिशान कारही जप्त होणार रॉयल एनफिल्ड यासह विविध दुचाकी आणि बीएमडब्ल्यू झेड-4, टोयोटा लँण्ड क्रुजर, फॉर्च्युनर, पोर्शे, बीएमडब्ल्यू 650 सीवॅट, बीएमडब्ल्यू 740 एलआय, ईटीऑस लिवा, एमव्ही ऑगस्था एफ 4 आरआर, ऑडी क्यू-5, अशा 40 चारचाकी जप्त संबंधित बातम्या बँकेकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली! डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर "डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी! बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
Chhaava Movie : 'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
Chhaava Movie : 'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Massajog Citizen On Suresh Dhas : सुरेश धस- धनंजय मुंडे भेट, मस्साजोगच्या नागरिकांचा संतापSanjay Raut PC : सुरेश धस, मुंडे आणि कराड एकच! देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला..ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 15 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 15 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
Chhaava Movie : 'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
Chhaava Movie : 'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Nashik Crime : भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मंत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मंत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
Dhule Crime : चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.