एक्स्प्लोर
पतीसोबत वादानंतर पुण्यात 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पुणे : पुण्यामध्ये पतीसोबत झालेल्या वादानंतर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाग्यश्री पवार असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीचं नाव आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. भाग्यश्री यांचा पतीसोबत काही वाद झाला. त्यानंतर सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची माहिती आहे. भाग्यश्री यांच्या घरातून पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये घरगुती वादातून आपण जीव देत असल्याचा उल्लेख केल्याचं वृत्त आहे. भारती विद्यापीठ पोलिस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या
रविवारीच पुण्यातील दत्तनगर परिसरातील टेल्को कॉलनीत बायको आणि दोन मुलींची हत्या करुन 42 वर्षीय इसमाने आत्महत्या केली होती.आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















