एक्स्प्लोर

मोठी बातमी : पिंपरीत 12 वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, मदतीसाठी याचना करुन थकला, जीव सोडला

Pune News: इमारतीतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट अचानक अडकली; लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, चौवीसवाडीत दुर्दैवी घटना

पिंपरी चिंचवड:  पिंपरी चिंचवड ( Pimpri-Chinchwad News) परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील चौवीसवाडी येथील राम स्मृती सोसायटीत गुरुवारी (२ ऑक्टोबर) संध्याकाळी भीषण घटना घडली. लिफ्टचा (lift) दरवाजा न उघडल्याने एका १२ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोसायटीत शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम स्मृती सोसायटीच्या इमारतीतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट अचानक अडकली. त्यावेळी लिफ्टमध्ये १२ वर्षांचा मुलगा अडकून फसला. दरवाजा उघडत नसल्याने तो आत गुदमरू लागला. काही वेळाने परिसरातील रहिवाशांनी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले.(12-year-old boy stuck in lift dies in Pimpri-Chinchwad Pune)

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि लिफ्ट उघडून मुलाला बाहेर काढले. त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याने प्राण सोडल्याचे समजते. या दुर्घटनेनंतर चौवीसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यामुळे सोसायटीतील रहिवाशी संतप्त झाले असून लिफ्टच्या देखभालीत झालेल्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

चिमुरडा लिफ्टमध्ये नेमका कसा अडकला?

12 वर्षीय चिमुरडा लिफ्टमधून वरच्या मजल्यावर निघाला होता. चार मजली इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची, त्याचं दार लोखंडी पट्ट्याचं आहे. याचं लोखंडी पट्ट्यातून खेळता-खेळता पाय बाहेर आले. यामुळं लिफ्ट दोन मजल्यांच्या मधोमध अडकली. यात चिमुरड्याचे पाय फसल्यानं त्याने सुटका करुन घेण्यासाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून उपस्थित पोहचले, मुलाच्या आई-वडिलांना बोलवण्यात आले. मुलाची यातून सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु झाले. वेळ निघून चालला होता, काहीवेळाने अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान पोहचले, त्यांनी कटरच्या साह्याने मुलाची यातून सुटका केली. पण उशीर झाला होता, रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget