Pune PMC News : पाटबंधारे विभागाचा महापालिकेला ठेंगा; पुण्यासाठी केवळ 12.83 टीएमसी पाणी कोटा मंजूर
पुण्यासाठी केवळ12.82 टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. शहराची वाढणारी हद्द, लोकसंख्या याचा विचार करून पुणेकरांना वर्षाला 20. 90 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली होती.
![Pune PMC News : पाटबंधारे विभागाचा महापालिकेला ठेंगा; पुण्यासाठी केवळ 12.83 टीएमसी पाणी कोटा मंजूर 12 tmc water quota sanction for pune irrigation department pune pmc news Pune PMC News : पाटबंधारे विभागाचा महापालिकेला ठेंगा; पुण्यासाठी केवळ 12.83 टीएमसी पाणी कोटा मंजूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/a1555870ea1f74baa2b6825acbc5f21c1697099021113442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यासाठी केवळ (Water Issues) 12.82 टीएमसी (Pune PMC) पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. शहराची वाढणारी हद्द, लोकसंख्या याचा विचार करून पुणेकरांना वर्षाला 20. 90 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केलेली होती पाटबंधारे विभागाने खडकवासला आणि भामा आसखेड धरण प्रकल्पातून केवळ 12.82 टीएमसी पाणी साठा 2023-24 या वर्षासाठी मान्य करण्यात आला आहे.
यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास महापालिकेला तीन पट दंडाचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर करावे लागते, असा राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश आहे. त्यानुसार यावर्षी महापालिकेने लोकसंख्या आणि बाकी बाबी बघून 20.34 टीमसी पाण्याची मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने ठेंगा दाखवत 12.41 टीएमसी पाणी कोटा उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर महापालिकेने 2023-24 या वर्षासाठी अंदाजपत्रक सादर केले.
पुण्याची लोकसंख्या वाढली...
पुण्यात 2021मध्ये 23 गावं समाविष्ठ करण्यात आली होती. त्यामुळे लोकसंंख्या वाढली. त्यात पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यावसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्याची अधिक आहे. सगळं मिळून एकून 72 लाख लोकांना पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने 20.90 टीएमसी कोटा मंजूर करावी अशी मागणी महापालिकेने केली होती. 12.82 टीएमसी पाणी कोटा 1 जुलै 2023 ते 30 जून 2024 या कालावधीसाठी मान्य केला आहे. यामध्ये महापालिकेने 34 समाविष्ट गावे आणि 16 संस्थांची लोकसंख्या 10 लाख गृहित धरून त्यासाठी 2.36 टीएमसी पाणी कोटा मागितला होता. महापालिकेला गेल्यावर्षी 20.34 टीएमसी पाणी मागितले होते, त्यापैकी 12.41 टीएमसी पाणी कोटा मंजूर झाला होता.
गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी खास अधिकारी अन् उपायुक्त
पुण्यातील 23 गावांमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी (Pune PMC) प्रशासनातर्फे 4 उपायुक्त, 8 सहाय्यक आयुक्त आणि 16 संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संदर्भात परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे 12 गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने जुलै 2021 मध्ये हद्दीलगतची 23 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करताना गावाची हद्द आणि लोकसंख्या लक्षात घेत 23 गावांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)