Indapur News : जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत दोघांनी केलं खरेदीखत, 1 कोटी 15 लाखांची फसवणूक
जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत 3 हेक्टर 48 आर शेतजमिन नावावर करुन देत 1 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
![Indapur News : जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत दोघांनी केलं खरेदीखत, 1 कोटी 15 लाखांची फसवणूक 1 crore 15 lakh fraud in land purchase case in Indapur Indapur News : जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत दोघांनी केलं खरेदीखत, 1 कोटी 15 लाखांची फसवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/fe246098e187c237feb860ffc48beb77_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indapur News : इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडीमध्ये जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत 3 हेक्टर 48 आर शेतजमिन नावावर करुन देत 1 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या मूळ मालकाची भेट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील गट क्रमांक 93 मधील 3 हेक्टर 48 आर इतकी जमीन बनावट मालक उभाकरुन विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याविरोधात किशोर खाडे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. नरेश दुसेजा हे या जमिनीचे मूळ मालक आहेत. बनावट व्यक्तीने दुसेजा असल्याचे भासवत दस्तावेळी बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त केल्याचे समोर आले आहे. या विरोधात खाडे यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बारामती पोलीस अधिक तपास करीत आहेत. यामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज बारामती पोलिसांनी वर्तवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)