एक्स्प्लोर

पुणे बाजीराव रोड हत्या प्रकरण! तीनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. आजही पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Crime News :  गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. आजही पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. मयंक खराडे (17 वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. ही घटना पुण्यातील बाजीराव रोडवर घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तीनही आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. 

आरोपी निष्पन्न करुन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हेगांविरोधात विरोधात मोहीम सुरू झाली आहे. अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्हेगारीबद्दल एक मोठं आव्हान असल्याचे पोलीस अधिकारी म्हणाले. कायदेशीररित्या जे अधिकार आहेत त्यानुसार कारवाई होत असल्याचे पोलीस म्हणाले. 

पुण्यात नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य

बाजीराव रोड खून प्रकरण पूर्व वैमान्यासातूनच घडल्याचं समोर आलं आहे. या  खून प्रकरणातील आरोपींची नाव निष्पन्न झाली आहेत. पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य असल्याचं बोललं जात आहे. अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी या आरोपींची नावे आहेत. धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांनी मयंक खराडेचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींनी मयंक खराडेचे कोयत्याने केस छाटले होते. तसेच बोटही कापले होते. कापलेल बोट रात्यावर पडल्याचं पाहायला मिळालं. 

मास्क घालून तीन तरुण आले आणि...

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजून 15 मिनीटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. अभिजीत इंगळे व त्याचा मित्र मयंक खरारे हे दुचाकीवरु जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्या जवळ दखनी मिसळच्या समोर अचानक जनता वसाहत मधील तीन तरुणांनी ज्यांनी मास्क लावला होता हे पाठीमागून आले. या तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने वार केले. त्यामध्ये मयंक खराडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

गेल्या 3 दिवसात झालेला हा दुसरा खून आहे. त्यामुळे, शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गेल्या काही महिन्यात अशा घटनांत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गणेश काळे हत्याप्रकरणाने खळबळ उडाली होती. त्यानंतर, आता 17 वर्षीय मयंक खराडे या युवकाचा खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुनााची घटना घडली आहे. धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे. या खुनाच्या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
Rahul Gandhi : राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget