एक्स्प्लोर

सणांच्या काळात डाळींच्या किंमती गगनाला भिडणार

नवी दिल्ली: कृषी उतन्न बजार समिती APMC नुसार, सध्या तूर डाळीची किंमत 220 रुपये प्रति किलो आहे. येणाऱ्या काळात त्याच्या किंमतीत वाढ होऊन ती 300 रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे. हे दर नवीन स्टॉक बाजारात येईपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. यात तूर डाळ ही 220 रुपये प्रतिकीलो, हरबरा डाळ 140-160 रुपये प्रतिकिलो, उडीद डाळ 180 रुपये, मूग डाळ 100 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. सध्या हे दर मागणी आणि पुरवठा यावर आधारित आहेत. धुळ्यातील एका व्यापाऱ्याने दिलेल्य माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे.   तर APMC चे संचालक नानासाहेब पाटील यांच्या मते, डाळींच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची कमी होण्याची शक्यता नाही. येत्या दोन महिन्यात केवळ मूगाच्या डाळीच्या दरातच कपात होण्याची शक्यता आहे. मूग डाळीची बाजार समितीत आवक ऑगस्ट महिन्यानंतर सुरु होते, तर दुसऱ्या डाळींची आवक इतर महिन्यात होते. मूग डाळीची लागवड डिसेंबर-जानेवारीमध्ये होते, तर हरबऱ्याच्या डाळीची लागवड फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. त्यामुळे येणाऱ्या काळात डाळींच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.   पाटील म्हणाले की, ''आगामी गणेशोत्सवाच्या काळात डाळीच्या किंमतीत मोठी वाढ होऊन ती 300 रुपये प्रतिकिलो मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने डाळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे दर येणाऱ्या काळतही आणखी वाढण्याची शक्यता आहे.''   पाटील पुढे म्हणाले की, ''सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील 71 लाख हेक्टर शेतजमीनीवर डाळींचे उत्पादन होते. 15 जुलैपर्यंत 51 लाख हेक्टर शेतजमीनीवर डाळीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डाळीचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यातून शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होईल. या वर्षी तूर डाळीचेच उत्पादन 1 कोटी 28 लाख टन आहे. गेल्यावर्षी हेच उत्पादन 3.17 कोटी टन झाले होते. तर चालू वर्षी डाळींचे एकूण उत्पादन 2 कोटी 70 लाख टन होण्याची आशा आहे. गेल्या वर्षी डाळीचे उत्पादन 3 कोटी 35 लाख टन झाले होते.   या वर्षी भारतातील डाळीच्या कमी उत्पादनामुळे येणाऱ्या काळात डाळीची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागणार आहे. भारताला ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, दक्षिण आफ्रिका, म्यांनमार आदी देशांतून डाळींची आयात करावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारदेखील डाळींचे उत्पादन वाढण्यासाठी डाळ उत्पादक शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन देत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UPSC Result : भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget