Aaditya Thackeray: वर्ल्डकपची फायनल मुंबईबाहेर नेणाऱ्यांनी धडा घ्यावा, कालचं सेलिब्रेशन म्हणजे BCCI ला स्ट्राँग मेसेज, आदित्य ठाकरेंनी डिवचलं!
Team India celebration in Mumbai: विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचे शुक्रवारी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी मरिनड्राईव्ह परिसरात अलोट जनसागर लोटला होता. याठिकाणी अक्षरश: मुंगी शिरायला जागा शिल्लक नव्हती.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने ट्वेन्टी 20 विश्चचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर देशभरातील क्रीडा चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कालच टीम इंडियाचे मायदेशात आगमन झाले होते. टीम इंडियातील (Team India) खेळाडुंनी प्रथम दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाचे मुंबईत (Mumbai) आगमन झाले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत आणि जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
भारतीय संघाच्या खेळाडुंनी ज्या ओपन डेक बसमधून काढण्यात आली ती बस गुजरातची असल्याने विरोध संतापले होते. यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी एक ट्विट करुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) टोला लगावला आहे. कालचं मुंबईतील सेलिब्रेशन हा बीसीसीआयसाठी एक ठळक संदेश होता. विश्वचषक स्पर्धेची फायनल कधीही मुंबईबाहेर ठेवू नका, हे बीसीसीआयला कळाले असेल, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Yesterday’s celebration in Mumbai is also a strong message to the BCCI…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 5, 2024
Never take away a World Cup final from मुंबई!
गेल्यावर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना (Ind Vs Aus Final) हा नेहमीप्रमाणे कोलकाता किंवा मुंबईला न खेळवता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (PM Modi Stadium) खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता.
गुजरातच्या बसला आम्ही पार्किंगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा: रोहित पवार
काल मुंबईत भारतीय संघाच्या खेळाडुंची ज्या ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती, ती बस गुजरातमधून आणण्यात आली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मुंबईत बेस्टच्या बसेस असताना गुजरातमधून बस का मागवण्यात आली, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. आमदार रोहित पवार यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका करताना म्हटले होते की, वर्ल्डकप टीमच्या रॅलीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही चांगली पार्कींगची जागा देऊ. पण, बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे, टीम इंडियाच्या रॅलीत बेस्टची बस वापरल्यास आम्हाला अधिक आनंद होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....