एक्स्प्लोर

Raj Thackeray: राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागची 3 प्रमुख कारणं

MNS Gudipadwa rally: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहून दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना म्हटले की, सध्याची राजकीय परिस्थिती भीषण आहे. मला या सगळ्या युती-आघाड्यांच्या भानगडीत पडायचे नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी बाजूला राहून एखाद्या राजकीय पक्षाला केवळ बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांसह महाराष्ट्रातील मतदारांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी म्हटले की, कृपा करुन या व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. महाराष्ट्रात या राजकीय व्यभिचाराला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण असतील, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला.

नरेंद्र मोदींसारख्या खंबीर नेतृत्वाची देशाला गरज

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना बिनशर्त पाठिंबा दिला. यामागील भूमिका सांगताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी माझ्या घरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहेत, हे फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी  भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्याची रणनीती

राज ठाकरे यांनी यावेळी मनसैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. आपल्याला यंदाची विधानसभा निवडणूक ताकदीने लढवायची आहे, असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला. विधानसभा निवडणुकीसाठी आता सहा ते सात महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आतापासून तयारी सुरुवात केल्यास मनसेला उमेदवारी निवडीपासून ते साधनसामुग्रीची जुळवाजुळव करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल.

लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी झालेला उशीर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी काही महिन्यांपूर्वीच तयारी सुरु केली होती. त्या तुलनेत मनसेच्या गोटात शांतता होती. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे दौरे वगळता लोकसभा निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने मनसेच्या स्थानिक नेत्यांनी कोणतीही विशेष तयारी केली नव्हती. किंबहुना राज ठाकरे यांच्याकडून तशा स्पष्ट सूचनाही मनसैनिकांना देण्यात आल्या नव्हता. तसेच भाजपशी युतीची चर्चा करण्यात राज ठाकरे यांचा बराच वेळ गेला होता. अमित शाह यांच्याशी बोलणी फिस्कटल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवायचे ठरवले असते तरी उमेदवार निवडीपासून ते बाकीची जुळवाजुळव करण्यासाठी मनसेला फार कमी वेळ मिळाला असता. हा सर्व गोष्टी ध्यानात घेऊन राज ठाकरे यांनी लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याला पसंती दिल्याचे दिसत आहे. 

आणखी वाचा

मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी टीका केली नाही, राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget