Maharashtra Vidhansabha Election 2024 : लोकसभेच्या निकालानंतर (Lok Sabha Election Result) आता विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राज्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या (Western Maharashtra Politics) ऊस पट्ट्यात कोण राजकीय पेरणी करणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा कमबॅक केल्याचं दिसून आलं. तर भाजपची काहीशी पिछेहाट झाली. त्यामुळे आज जर निवडणूक झाली तर महाविकास आघाडीचे आमदार अधिक संख्येने निवडून येणार असल्याचं चित्र आहे
लोकसभेचे दहा मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या विधानसभेचे 59 मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत यापैकी 33 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचं दिसून आलं. तर 26 विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं. त्यामुळे आज जर निवडणूक झाली तर 33 ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील तर 26 ठिकाणी महायुतीचे आमदार निवडून येतील.
आज निवडणूक झाली तर पश्चिम महाराष्ट्रात कुणाची बाजी?
पश्चिम महाराष्ट्र - 59
मविआ - 33
महायुती - 26
पश्चिम महाराष्ट्रातील हायहोल्टेज लढतील मविआची बाजी
पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा हायहोल्टेज लढती झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये बारामती, पुणे, कोल्हापूर, माढा, सोलापूर, शिरूर आणि सांगलीचा समावेश होतो. 2019 च्या निवडणुकीत भाजपला चार ठिकाणी, शिवसेनेला तीन ठिकाणी आणि राष्ट्रवादीला तीन ठिकाणी विजय मिळाला होता. त्या उलट यंदा चित्र पलटलं असून दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गट, दोन ठिकाणी भाजप, दोन ठिकाणी काँग्रेस, तीन ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली.
यंदा सर्वाधिक चर्चा झाली ती बारामतीच्या निवडणुकीची. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामध्ये बारामती कुणाची, काकांची की पुतण्याची? या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा मोठा पराभव केला.
माढा आणि सोलापूरमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला झोबीपछाड देत या जागांवर पुन्हा एकदा ताबा मिळवला. तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी शिंदे गटाच्या मंडलिकांचा जवळपास दीड लाखांच्या मतांनी पराभव केला.
पश्चिम महाराष्ट्रातले नवनिर्वाचित खासदार
हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे)
मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे)
पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप)
सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस)
सोलापूर - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
सांगली- विशाल पाटील (अपक्ष)
बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
शिरूर - डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार)
माढा - धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार)
विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडी
एकूण जागा - 288
मॅजिक फिगर - 145
मविआ - 150 +
महायुती - 130 +
विदर्भ - एकूण जागा - 62
मविआ - 42
महायुती - 19
मराठवाडा - एकूण जागा- 48
मविआ - 34
महायुती - 12
एमआयएम- 02
मुंबई- 36
मविआ - 20
महायुती - 16
पश्चिम महाराष्ट्र - 59
मविआ - 33
महायुती - 26
उत्तर महाराष्ट्र - 48
मविआ - 19
महायुती - 29
कोकण- 12
मविआ - 5
महायुती - 7
ही बातमी वाचा: