एक्स्प्लोर

संदीप देशपांडेंच्या अगोदर विधानसभा तिकीट मिळवणारे दिलीप धोत्रे कोण?, राज ठाकरेंच्या उमेदवारास 2009 साली किती मतं

दिलीप काशिनाथ धोत्रे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार असल्याचे पत्रकच मनसेनं जाहीर केलं आहे.

मुंबई/सोलापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. त्यामध्ये, राज ठाकरे यांचे खास आणि मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या मुंबईतील बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, दुसरा उमेदवार मुंबई, पुणे, ठाणे किंवा नाशिकमधील नसून चक्क सोलापुरातील जाहीर करण्यात आला आहे. मनसेनं पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. मनसेचे सरचिटणीस असलेल्या संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीपूर्वीच दिलीप धोत्रेंची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, बाळा नांदगावकर यांच्यासमवेत उमेदवारी जाहीर केलेले दिलीप धोत्रे नेमकं कोण आहेत, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे आमदार आहेत. 

दिलीप काशिनाथ धोत्रे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार असल्याचे पत्रकच मनसेनं जाहीर केलं आहे. त्यामुळे, काही दिवसांपूर्वीच राज्यात 225 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यातूनच याची सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा एकला चलो रे चा नारा देत आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजप महायुतीत ते सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. कारण, येथील मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान अवताडे आहेत. त्यामुळे, महायुतीमध्ये मनसेचं स्थान नसणार असल्याचे दिसून येते. मात्र, ऐनवेळी भाजप नेते राज ठाकरेंची मर्जी राखत त्यांना महायुतीत सहभागी होण्यासाठी राजी करतात का, ते पाहावे लागेल. मात्र, मनसेनं उमेदवारी जाहीर केलेले दिलीप धोत्रे कोण, असाही प्रश्न अनेकांना पडला असून दिलीप धोत्रे हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत आहेत.

कोण आहेत दिलीप धोत्रे

दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असून विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दिलीप धोत्रे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून ते मूळ शिवसैनिक आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला, उत्तम संघटन कौशल्य असल्याने शिवसेना ते मनसे असा त्यांचा प्रवास चढत्या क्रमाने झाला. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता. धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी मनसेमध्ये पार पाडली आहे. त्यानंतर, नुकेतच त्यांना पक्षात नेतेपदही देण्यात आले आहे.  

2009 साली निवडणूक लढवली

आता राज ठाकरेंनी 2024 विधानसभेसाठी जे पहिले दोन उमेदवार जाहीर केले त्यात दिलीप धोत्रे यांचा समावेश आहे. दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी 2009 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते, नंतरच्या काळात धोत्रे यांनी कामगार शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नावर अनेकवेळा आवाज उठवत आंदोलने केली. कोविडच्या काळातही त्यांनी मोठे काम केल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांचा मोठा मतदार वर्ग तयार झालेला आहे. तर, राज ठाकरेंच्या सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर येथील दौऱ्यांतही दिलीप धोत्रे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असते. 

हेही वाचा

मोठी बातमी : मनसेचे विधानसभेसाठी दोन उमदेवार जाहीर, राज ठाकरेंची घोषणा, बाळा नांदगावकरांना उमेदवारी, दुसरा उमेदवार कोण?

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
Amit Thackeray : चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडून विद्यार्थिनींना 2000 रुपयांच्या पॉकेटमनी देण्याच्या हालचाली, अमित ठाकरे संतापले, म्हणाले...
चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडून विद्यार्थिनींना 2000 रुपयांच्या पॉकेटमनी देण्याच्या हालचाली, अमित ठाकरे संतापले, म्हणाले...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget