एक्स्प्लोर

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांचा 'तो' व्हिडीओ खरा, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती

Kirit Somaiya Viral Video : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे.

Kirit Somaiya Viral Video : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाने या व्हिडीओचे विश्लेषण केले आणि तो मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.

गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ एका स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

मुंबई क्राईम ब्रान्चच्या युनिट 10 कडून तपास सुरु

यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे सोपवण्यात आला असून त्यांनी तपास सुरु केला आहे. प्राथमिक आधारावर गुन्हे शाखेने संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हिडीओची मागणी केली. तपास यंत्रणेला किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडीओचे विश्लेषण केले आणि ते व्हिडीओ खरे असल्याचे आढळल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

आक्षेपार्ह व्हिडीओने खळबळ

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आमच्या कानावर आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसंच अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.

 चौकशी करुन अहवाल सादर करा, राज्य महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना निर्देश

यासंदर्भात राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी महिला आयोगाकडे यासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर महिला आयोगाकडून मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना  पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

Chitra Wagh on Kirit Somaiya : किरीट सोमय्या प्रकरणाने आम्हाला धक्का, याची पाळंमुळं शोधणार; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget