मुंबई: येत्या 12 तारखेला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंग भरले आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागा असताना 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता कोणत्या एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी (MLC Election 2024) एकूण पाच उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधानभवनात येऊन विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रातून पंकजा मुंडे यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे. त्यानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे तब्बल 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. तसेच स्त्रीधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यात पंकजा मुंडे यांनी मोठी गुंतवणूक केल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे तब्बल 45 तोळे सोने असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांची नेमकी संपत्ती किती?
* पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात ठेवी
91 लाख 23 हजार 861
* विविध शेअर आणि म्युच्युअल फंड - 1 कोटी 28 लाख 75 हजार 694
* पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही वाहन नाही
* पंकजा मुंडे यांचा व्यवसाय- शेती आणि समाज सेवा
* उत्पन्नाचा स्रोत - शेती, माजी विधानसभा सदस्य निवृत्तीवेतन व भाडे उत्पन्न
* पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत - 96 लाख 73 हजार 490
* जंगम मालमत्ता - 6 कोटी 8 लाख 15 हजार 709
* पंकजा मुंडे यांच्या नावे एकूण कर्ज - 2 कोटी 74 लाख 89 हजार 518
* पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावावर बँक कर्ज - 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयाचे कर्ज
* पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावे वैयक्तीक कर्ज - 24 कोटी 77 लाख 75 हजार 918
* पंकजा मुंडे यांच्याकडे असलेली रोख रक्कम - 2 लाख 84 हजार 530
* सोने - 450 ग्रॅम किंमत - 32 लाख 85 हजार
* चांदी - चार किलो - 3 लाख 28 हजार
* इतर दागिने - 2 लाख 30 हजार
* शेती अवजारे -40 हजार रुपये
* कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स- 15 हजार 800 रुपये
पंकजा मुंडेंचे पती चारुदत्त पालवे यांच्या नावावर किती संपत्ती?
* सोने - 200 ग्रॅम - 13 लाख
* चांदी - 2 किलो - 1 लाख 38 हजार
* इतर दागिने - 2 लाख 15 हजार
आणखी वाचा
पंकजा मुंडेंना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...